पोस्ट्स

कावळा.

इमेज
खूप पोटात दुखतयं गं आई  माझ्या बहिणीने आईला सांगितलं काय झालंय गं बहिणीला मी तीला विचारलं तीला आज कावळ्यानं शिवलं जवळ जाऊ नकोस ती उद्गारली आत्ता तर मी तीच्या जवळपास एकपण कावळा हींडू देत नाही मी असतानाही कसा शिवला कावळा  गुढ काही उलगडत नाही  कधीतरी मला पण शिवेल कावळा म्हणून मी आता अंगप्रदर्शन करत आहे फक्त पुरुषांनाच अंगप्रदर्शनाचा हक्क असतो का? साऱ्या जगाला प्रश्न विचारत आहे वासना पुरुषांच्या डोळ्यात असते की डोक्यात हेच मला समजत नाही लाज, शरम व अब्रू कुठे त्यांनी विकली उत्तर काही मिळत नाही (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मासिक पाळी. ( Periods)

इमेज
माझा आवडता लाल रंग त्या दिवसात मला आवडत नाही वेदना माझ्या त्या दिवसाच्या काही केल्या लपवत नाही बाईचा जन्म माझा म्हणून टोमणे मला सहन होत नाही शुध्द - अशुध्द अशी कशी मी झाले हे गणित मला उमजत नाही हात - पाय गळून पोट दुखणे हे अनेकदा सहन होत नाही मासिक पाळी प्रत्येक महिन्याला का येते या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही गणेश चतुर्थीला आला नंबर तर मन कुठेच काही रमत नाही देवाने दिलेले हे वरदान त्या दिवसात काही पटत नाही बाळंपणीला होते स्तुती पण  मासिक पाळीचे दु:ख समजत नाही अंकुर हे माझ्या पोटातील बीजानं फुलतं हे काही केल्या लोकांना कळत नाही पॅडच्या जागी कधी कपड्याला लागलं तर Awkward feeling लपवत नाही मासिक पाळी विषयीची अशिक्षिकता अजून काही केल्या जात नाही सांगितले दुःख मी माझ्या भावाला म्हणून काय ते कमी होत नाही पाच दिवस मासिक पाळीचे कधी - कधी मला आवडत नाही (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

GMC मधील ती.

इमेज
पांढरा कोर्ट  लाल - लाल ओठ सोनपरी माझ्या समोर आली I will check your pulse rate गालातल्या गालात हसत म्हणाली Hmm it's too fast ती उद्गारली तीला काय माहीत तीच्या स्पर्शाने  माझ्या हृदयाची रेल्वेच घसरली मी वेड्यापरी तीलाच न्याहाळत लागलो डॉक्टर पण इतकी Hot असू शकते  हे मला त्या दिवशी कळालं  Are you feeling ok ? तीने तंद्री तोडीत विचारले मी जरा बेशुद्धपणाची  नाटकं करू लागलो ती जराशी घाबरली  माझ्या शर्टाचे बटन उघडून  मला पुन्हा तपासू लागली  मनात माझ्या अनेक विचार येत होते काय तीची शरीर रचना करावा का थोडासा रोमान्स  असे अनेकदा वाटत होते मी तीला एकटक पाहतोय हे तीला कळालं  माझ्या कानफटीत लावून  तीने वासनेचं भुत उतरवलं GMC मधील ती  आता फक्त कवितेत राहीली त्या दिवसानंतर आजपर्यंत तीने माझ्याकडे पाठ फिरवली  GMC मधील ती  आता फक्त कवितेत राहीली (२)  कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी.

इमेज
मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी युनिव्हर्सिटीच्या वर्गात भेटलो चंद्र तारे सगळे फिके मी अप्सरेच्या प्रेमात पडलो  तशी आमची मैत्री जुनी  त्याला नवीन अंकुर फुटलं स्वप्नात घेऊन तीला कुशीत आमचं प्रेम तीथेच कुठंतरी फुललं भाषा आपल्या वेगळ्या तरी हृदयाचं गणित तीने बिघडवलं नक्षेदार डोळ्यांच्या तीच्या हाकेने कोंकणी - मराठीचं मिलन घडवलं  मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी M.A पुर्ण करता एकामेकांच्या प्रेमात पडलो भाषा, जात, धर्म या पलीकडे प्रेम असतं हे आम्ही सगळ्या जगाला शिकवलं मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी एकामेकांच्या प्रेमात पडलो (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

म्हणून केली नाही आत्महत्या.

इमेज
हिंमत होत नाही माझी स्वतःला लटकवून घ्यायची  पुलावरून नदीत उडी टाकायची हाताची नस कापण्याची म्हणून केली नाही आत्महत्या भिती वाटते मला माझी मी गेल्यावर होणाऱ्या परीस्थितीची  आई- वडीलांच्या वाढत्या वयाची बहीणीच्या होऊ घातलेल्या लग्नाची म्हणून केली नाही आत्महत्या लाज वाटते मला माझी एवढ्या लवकर हार मानली त्याची चार दिवस दु:खाचे काढू शकलो नाही त्याची कष्ट करण्यास आळसपणा केला त्याची म्हणून केली नाही आत्महत्या शेतकरी राजा घामाने अन्न पिकवतो दिवा वाऱ्यात पण तेवत राहतो  गरीब कष्टाने परीस्थितीशी लढतो तीच ताकत माझ्यात पण येईल म्हणून केली नाही आत्महत्या होईल सगळं सारखं जाईल दुःखाचे क्षण  येईल सोनेरी दिवस हीच आशा मनात फुंकून  केली नाही आत्महत्या (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मी मेल्यावर.

इमेज
आभाळदाटून पाऊस  अविरत पडू लागला मी मेल्यावर  ग्रह इतकी काय बदलली पुर आला पण जमीन कोरडीच राहीली मी मेल्यावर शरीर थंड पडेल हृदयाची टीक टीक बंद होईल कोणी अलाराम प्रमाणे हंबरडा फोडेन मी फक्त कान बंद करून झोपी जाईल मी मेल्यावर सुवासिक फुलांनी मला सजवले जाईल अत्तराचा सुगंध इतका होईल की  चितेची आग लगेच शमली जाईल मी मेल्यावर बाबा गेले आई गेली  मित्र सवंगडी सगळे गेले भुतांबरोबर मला एकटे सोडून साले गर्दीतले मुखवटेवाले गेले मी मेल्यावर  हाडांचे सांगाडे नदीवर गेले घेऊन अश्रूंच्या पोटली वाहून दिल्या त्या आठवणी  सुकलेल्या नदी तीरी मी मेल्यावर राहील्या फक्त आठवणी पुस्तकाच्या पानांप्रमाणे फाडल्या जातील मी असेन खूप दुर काही नक्षत्रामध्ये माझा शोध घेतील मी मेल्यावर स्मृती माझ्या पुसल्या जातील चार दिवस काय ते रडणे मग सगळे आपल्या कामात मिश्किल होतील मी मेल्यावर हो, मी मेल्यावर वरील सगळे काही घडून जाईल माझी ही अर्धवट कविता तेव्हा पुर्ण होईल मी मेल्यावर हो, मी मेल्यावर (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मनातले मला आज सांगायचे होते.

इमेज
मनातले मला आज, तुला सांगायचे होते. करतो मी तुझ्यावर प्रेम, हे गुपित आज उलगडायचे होते. पण तुला पाहताच सारे, देहभान मी हरपले होते. धुंदीत तुझ्या मी रात्रंदिवस, तुझेच स्वप्न पाहिले होते. मनातले मला आज, तुला सांगायचे होते. तुझ्या काळ्याशार नयनांमधून, मला माझे सावळे प्रतिबिंब पाहायचे होते. घेऊन तुला मिठीत, प्रेमाचे अंकुर फुलवायचे होते. ओल्या चिंब पावसात मला, तुझ्यासवे भिजायचे होते. टेकवून ओठांना ओठ त्या पावसात, रसगुल्याचे ओठ मला चाखायचे होते. मनातले मला आज, तुला सांगायचे होते. असतील अनेक पऱ्या तरी मला, त्या एकच परीला पटवायचे होते. परत एकदा त्या परीला, गुलाबी साडीमध्ये कुशीत माझ्या घ्यायचे होते. नाही मला फक्त शारिरीक आकर्षण, तिचे सर्व आरोप मला पुसायचे होते. खरं प्रेम करतोय मी तिच्यावर, हे मला आज उलगडायचे होते. मनातले मला आज, तुला सांगायचे होते.(२) कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

उमलत्या कळ्यांना आवरा.

इमेज
उमलत्या कळ्यांना आवरा  त्यांची नीट काऴजी घ्या त्यांचं रक्षण करा.. कारण वातावरण दुषित आहे, विषारी ‌आहे. नाही तर त्यांना फुलूच देऊ नका उगाच त्यांना दु:ख नको.. लवकर निर्णय घ्या... समाजात राक्षसांची फौज फिरत आहे त्यांची वाकडी नजर पडण्या आधिच काही तरी करा.. उमलत्या कळ्यांना आवरा.. समजा‌ आवरणं जमत नसेल तर राक्षसांना तोंड द्या.. उगाच मेणबत्ती फिरवली म्हणून तो‌ मरणार नाही.. हिंमत असेल तर जा त्याचा घात करा , अंत‌ करा तुमच्यातील देवीला जाग करा.. निर्णय तुमच्या हातात आहे.. विचार ‌करा... नाहीतर उमलत्या कळ्यांना आवरा.. कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

शमलेला पाऊस.

इमेज
ढगांचेसुध्दा अश्रू दाटून आले, विजांचेही घोर युद्ध झाले, पिसाळलेला वारा जोर- जोराने वाहू लागला, आज स्मशानातली माझी प्रेतयात्रा पाहून, पाऊसपण उदास झाला. माझ्या तिरडीला सलामी देऊन, कळ्या नभातूनच नजरेआड झाला, माझ्या सरणाची आग शमताच, परत जोर- जोराने रडू लागला. (२) कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

Love at first sight.

इमेज
Gorgeous! काय दिसते रे यार ती, सहज तोंडातून उद्गार आले. जेव्हा मी तिला सृजनोत्सव मध्ये, लाल गुलाबी साडीत पाहिले. त्या लाल गुलाबी साडीमध्ये ती, लाल - लाल टमाटर दिसत होती. स्वप्नात मला आपल्याकडे खेचून, हळूच एक मुका देत होती. अरे विश्वनाथ काय झालं तुला? अचानक तिने मला प्रश्न केला. मी निरुत्तर तिला पाहतच राहिलो, हे स्वप्न तर नाही ना? मी मलाच विचारत राहिलो. 'आज तू खूप गोड दिसतेस. पाहता क्षणापासून तू मला आवडतेस. मला वाटतं माझा तुझ्यावर crush आहे', मी घाबरत - घाबरत तिला सांगितले. तिने पण लाजून, थॅंक यू, तू पण हीरो दिसतोस असे प्रतीउत्तर सांगितले. तिच्या हीरो या complimentने, माझ्या हृदयाचे ठोकेच गडबडले. Love at first sight सुद्धा असतं, हे‌ मला त्या दिवशी ‌उमजले. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

परिस्थिती मनाची.

इमेज
धीर - गंभीर मन माझे, चलबिचल होत आहे. सकारात्मक विचारांपेक्षा मनामध्ये, नकारात्मक विचार जास्त घुमत आहे. कसं आवरु ह्या वात्रट मनाला, डोकं सगळं बधीर होत आहे. वाढते कोरोना व्हायरसचे पेशंट बघून, हृदयाचे ठोके वर-खाली होत आहे. सरण पेटले आहे, मरण बोलवत आहे असे, नको नको ते विचार मनामध्ये येत आहे. चलबिचल मन‌ माझे‌ आता, माझ्या आवाक्याबाहेर जात आहे. मला तर‌ नाही ना होणार कोरोना? असा प्रश्न ते परत-परत विचारत आहे. पण परिस्थिती ही घाबरलेल्या मनाची, हळूहळू सुधारू लागली आहे. बरे होतात कोरोनाचे रूग्ण, अशी सकारात्मक बातमी जी आली आहे. पण सावरलेले मन‌ माझे आता, वेड्या मुलापरी‌ वागत आहे. कधी जाणार तू कोरोना? आता तरी जा ना तू प्लीज, अशी विनवणी तो‌ त्यालाच करत आहे. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मोबाईल.

इमेज
मांडलाय बाजार भावनांचा, संवेदनाहीन मोबाईल नावाच्या मनामध्ये. हरवले खरे हास्य मी, खोट्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये. मेंदू वजा डोकं झालंय माझं, अडकलंय मोबाईलच्या सीपीयूमध्ये. तुटली सगळी खरी नाती, फसलोय मोबाईलच्या खोट्या नात्यांमध्ये. मरून गेलं खरं प्रेम सारं, अपडेट झालंय ते ‌मोबाईलच्या स्टिकरमध्ये. भरकटलंय वेडं मन माझं, बधीर झालंय मोबाईलच्या व्हायरसमध्ये. पुसले गेले सगळे सुविचार, अश्लील मोबाईलच्या कुविचारांमध्ये. विसरून गेलोय सगळे फायदे त्याचे, कलियुगातील मोबाईलच्या राक्षसांमध्ये. फिकट झालंय पोषणयुक्त जेवण सुद्धा, पोट भरू लागलंय मोबाईलच्या विषांमध्ये. कुस्करून गेलंय जीवन सगळं, हॅंग झालंय ते मोबाईलच्या खोट्या विश्वामध्ये. मांडलाय बाजार भावनांचा, संवेदनाहीन मोबाईलच्या मनामध्ये. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

आज मी स्वप्न पाहिले होते.

इमेज
दिसताच क्षणी ती मला भावली होती, जणू काय आकाशातून अप्सराच, धरतीवर मला भेटायला आली होती. नुकतीच काय तर आमची दोस्ती झाली होती, तिच्या बरोबर बोलायची इच्छा मनात आली होती, पण साली बोबडीच तिच्या पुढ्यात बंद झाली होती. आज मात्र सगळे चित्रच बदलले होते, कधीही न बोलणाऱ्या गप्प- गप्प बसणाऱ्या माझ्या त्या अप्सरेने हळूच, मला हाका मारून बोलावले होते. तिच्या त्या हाकेने माझे‌ हृदयच पिघळले होते, तिच्या तोंडून माझेच नाव परत परत ऐकताना, कान पण सुन्न झाले होते. "ऑई विश्वनाथ! ऑई विश्वनाथ!" तिचे ते शब्द अजूनही, माझ्या कानात घुमत होते, घुमत - घुमत प्रेमाचे गीत वाजवत होते. आजच्या मराठी तासाला तिला खूश करण्यासाठी, मी माझ्या ‌काही कवितांचे‌ सादरीकरण केले‌ होते, कविता सादर करतांना तिला माझी राणी करण्याचे, आज मी स्वप्न पाहिले होते. आज मी स्वप्न पाहिले होते.             कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मी म्हणालो शब्दांना.

इमेज
मी म्हणालो शब्दांना तिला पण भेटून ये. तिचे चित्र माझ्या मनात व माझे तिच्या मनात हळूच कोरून घे. माझ्या मनातले तिला व तिच्या मनातले मला हळूच सांगून ये. माझा स्पर्श तिच्या गालांवर व तिचा स्पर्श माझ्या गालांवर हळूच करून ये. तिला माझ्या मिठीची ऊब व मला तिच्या मिठीची ऊब हळूच देऊन ये. तिला प्रत्येक क्षणाला माझी आठवण व मला प्रत्येक क्षणाला तिची आठवण हळूच करून दे. दगदगीच्या ह्या जीवनात काही, प्रेमाचे क्षण आम्हाला हळूच घालवू दे. मी म्हणालो शब्दांना तिला पण भेटून ये. कवितेत तरी तिला माझी प्रेयसी व्हायला व तिचा मी प्रियकर व्हायला हळूच एक कविता लिहून दे.(२)  कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

हरवलेत शब्द.

इमेज
हरवलेत शब्द कुठेतरी, मला भेटत पण नाहीत. काळोखानंतर उगवणार सूर्य, याची शाश्वती मला दिसत नाही. एवढं काय म्हणून घडलं, मला काहीच उमजत नाही. करून मला पोरकं वांझ, कविता मला भेटायला येत नाही. डोकं झालय सगळं‌ सुन्न, एक शब्दसुद्धा सुचत नाही. प्रेम, समाज, निसर्ग विषयक शब्द काहीच बोलत नाही. कुठे हरवलय रे मी मित्रा तुला, माझ्या आतला कवी मला सापडत नाही. नाळ माझी आणि तुझी तुटली अशी, काही केल्या परत जोडत नाही. रडून- रडून पोखळ झालोय मी आतून, तरी दुःख‌ माझे त्याला समजत नाही. मरत नसतो कवी कुठलाच, हे‌ बोलसुद्धा कानाला समाधान देत नाही. आत्मा कसा माझा भरकटला असा, काही केल्या माझ्या आत तो येत नाही. आत्ता शेवटची एकच ईच्छा राहिली आहे, तिला पण हा दुरावा सहन होत नसेल. कदाचित हरवलेत जरी शब्द मी, ती मला असं एकटं सोडून जाणार नाही.(२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

संमेलनातील ती.

इमेज
रोज uniform मध्ये दिसणारी ती , आज वेगळीच दिसत होती, त्या गुलाबी साडीमध्ये, एक गुलाबी कळी भासत होती. फसवे तिचे ते नयन, मला आपल्याचकडे खेचत होते, मिठीत तिच्या सामावून , मला आपलाच ते करत होते. आज माझ्या चंद्राचं चांदणं , खऱ्या अर्थानं फुलून आलं होतं, संमेलनात का होईना तिचं तेज , माझ्यावरच पडत होतं. वाटत होतं शिक्षकांच्या नजरा चुकवून , जावून बसावं तिच्या जवळ, एक- दोन प्रेमाचे बोल , बोलावेत तिच्या बरोबर. संमेलनापेक्षा माझी ती, जास्त आकर्षक वाटत होती, संमेलन गेलं खड्यात, आपल्यावर कविता लिहायला, मला ती भाग पाडत होती. आज संमेलन खऱ्यानेच, खूप सुंदर झालं होतं, माझ्या गुलाबाने मला आपल्या, श्वासातून मोहीत केलं होतं. संमेलनात येण्याचा हाच तर, खरा फायदा झाला होता, तिला डोळे भरून न्याहळतांना, हृदय मात्र तिचेच चित्र, मनामध्ये कोरत होता. (२)                      कवि  - विश्वनाथ पै भाटीकर.

Social media काय आलं जगणं सगळं बदलून गेलं.

इमेज
खोट्या भावना पाठवता - पाठवता, खऱ्या भावना विसरून गेलो, Social media काय आलं, जगणं सगळं बदलून गेलं. Forward message प्रमाणे, नाती सगळी Forward झाली, ओळखी- अनोळखी माणसे , नात्यांमध्ये upload झाली . नात्यामधल प्रेम पण, सगळं काही online भेटलं Offline आल्यावर मात्र, कोणीही आपलं नाही राहीलं. मरणाला पण आज माझ्या, Social mediaची जास्त आठवण आली, माझा photo केवळ status वर टाकून, भावना पण माणसांची update झाली. तिचं ते निरागस प्रेम पण, Social mediaमुळे upgrade झालं , Emojiच्या ह्या खोट्या विश्वात , खरं प्रेम तर बाजूलाच राहीलं. माणसांच्या गर्दीत पण, आज social media जास्त दिसत आहे, खरी माणुसकी तर कधीच मेली , माणूस फक्तं भावनाशून्य होत आहे. Social mediaच्या जाळ्यात अडकून, जगणं सगळं बदलत आहे. (२)                               कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

भेटायला ये.

इमेज
माहीत आहे मला, तू माझ्यावर रागावली आहेस, तरी तो राग दाखवण्यासाठी, म्हणून मला भेटायला ये. तुझ्या नयानातून मला स्वप्न रंगवायची आहे, तुझ्या नजरकैदेत मला कैदी व्हायचं आहे म्हणून मला भेटायला ये. अबोल असशील तू, मला तुला एकटक पाहायचं आहे, तुझ्या त्या भावनांना समजायचं आहे, म्हणून मला भेटायला ये. रसगुल्याचे ओठ तुझे, नाही चव त्याला साखरेची, मला अनुभवायची आहे ती चव, म्हणून मला भेटायला ये. तुझे ते लाजणे, लाजरीलाही लाजवेल असे, त्या लाजरीला मला स्पर्श करायचा आहे, म्हणून मला भेटायला ये. तुझ्या बरोबर ह्या पहिल्या, मृदगंध पावसात भिजायचे आहे, रुसलेल्या त्या पावसाला, माझ्या मिठीतून फुलवायचे आहे, म्हणून मला भेटायला ये. हे माझे प्रेमपत्र नाही, तर माझे हृदय समज, माझे हृदय तुझ्याकडे ठेवून, तुझे हृदय मला देण्यासाठी, म्हणून तरी मला भेटायला ये. भेटायला ये.            कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

जगणं हरवून गेलं.

इमेज
घडळ्याळाचे काटे धावले, वाऱ्यासारखे दिवस पसरले, रात्रीचे दिवस झाले, दिवसाची रात्र झाली , बुलेट ट्रेन मध्ये, आपली लोकल गोंधळली, प्रेम तर त्यात चिरडून गेलं, दगदग ही एवढी काय वाढली, की जगणं सगळं हरवून गेलं.  जगणं सगळं हरवून गेलं.(२)                     कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मृत्यूवर काही चारोळ्या.

इमेज
1) डोळे मिटताच शांत झोप लागली, मरणाला स्पर्श करताच, तंद्री त्याची तुटली .. (२)  कवि- विश्वनाथ पै भाटीकर. 2) आत्ताच गाढ झोपेतून उठलोय, थर - थर कापत घामाने चिंब भिजून , मरण म्हणजे काय ते समजून घेतलय, पण परत झोपून त्याच सरणावर, मरणाचा आनंद घेतोय... (२)  कवि- विश्वनाथ पै भाटीकर. 3) निःशब्द डोळे माझे मलाच पाहत होते, आत्मा होऊन स्मशानाच्या गर्दीत, आज मी स्वतःलाच जाळले होते...(२) कवि- विश्वनाथ पै भाटीकर. 4) श्वास जरी थांबला तरी, कार्य अजूनही जिवंत आहे. शरीर जरी मेलं तरी , आत्मा अजून कवितेमध्ये जिवंत आहे. कवि- विश्वनाथ पै भाटीकर. 5) स्मशानातली हाडं मोजताना, आत्मा तिथेच घुटमळत आहे. मृत्यू म्हणजे काय असते, ह्याचाच शोध घेत आहे. कवि- विश्वनाथ पै भाटीकर. 6) स्मशानातली रात्र संपली तरी , काळोख मात्र तसाच आहे. सूर्यालाही ग्रहण लागले कारण आज मृत्यूची हार आहे. 7) माझ्या सरणाची आग ही अजूनही शमली नाही, काळोखात अजून दिवा त्याचा मालवला नाही. मरण तर त्याला पाहूनच भयभीत होत आहे, आत्मांना एकत्र करून माझ्या अंताची वाट तो पाहत आहे. कवि- विश्वना...

मरण.

इमेज
ज्यांनी मला जन्म दिला, ते आक्रोश करीत रडत होते. मित्र - सवंगडी थक्क होवून, डोळ्यातून अश्रू गाळीत मलाच पाहत होते. गर्दीत जमलेले काही मुखवटे, मनातल्या मनात हसत होते. मेला एकदाचा म्हणत त्यामधलेच, काही माझेच गाणे गात होते. माझी ईर्ष्या  करणारे डोळ्यातून, पहील्यांदाच माझी माफी मागत होते. लाकडं घालतांना सगळ्यांचे, हात थर - थर कापत होते. एवढ्या लवकर डोळे का झाकले, असे विचारत काही छातीवर मारत होते. आज मी मरणाला - जळत्या सरणाला,  खूप जवळून पाहिले होते. स्वप्नात मला भेटून , पुढ्यात त्याच्या मी हरले होते. निःशब्द डोळे माझे आज , मलाच पाहत होते. आत्मा होऊन स्मशानाच्या गर्दीत, मी आज स्वतःलाच जाळले होते...(२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

वादळ.

इमेज
एक वादळ शमले तर दुसरे सुरू झाले, हरवलेले शब्दं त्यात कुठेच नाही सापडले, खूप नवे शब्दं त्यात मला मिळाले, पण शमलेले वादळ पुन्हा सुरू झाले. विचारांच्या वादळात मन पुन्हा धावू लागले, शब्दांना शोधता - शोधता , स्वतःलाच ते हरवून बसले.. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

हरवले.

इमेज
मनाच्या गाभाऱ्यात शब्दं हरवलेत, प्रेम हे माझे ओठांवर येण्या अगोदरच परतले. तिच्या शोधात मी सगळे काही गमवले, खऱ्या आयुष्यात नाही तर कवितेत तिला मिळवीले. कवितेमधून तिला सगळ्या भावना सांगितल्या, तरी तिला कधीच काही नाही कळले. हे पण प्रेम माझे तसेच हवेमध्ये उडाले, का कोण जाणे मला ऐकटे टाकून तसेच पळाले. प्रेम मला झालेच नव्हते हे मला उमगले, शब्दंप्रमाणे ते पण मनाच्या गाभाऱ्यात हरवले.. (२)     कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

आठवणी.

इमेज
आज पुन्हा ती मला भेटली, गर्दीत पण दृष्टीस पडली. आज पण तिचा चेहरा बोलका वाटत होता, आपलं प्रेमभंग झालं असलं तरी, मनात प्रेम अजून जीवंत आहे, हे ओरडून - ओरडून सांगत होता. तिने घातलेल्या पैंजणांचा आवाज मला तिच्या, मोडत - मोडत चालण्याची आठवण करून देत होता. ओठांवर माझ्या हसू आणून, दातात दाबून ठेवत होता. तिच्या कोमल हातांना पाहून, तिची सारी वचने आठवली. तिचा कोमल स्पर्श आठवला. तिच्या केसांना पाहून , प्राजक्ताची फुले आठवली, त्यांचा सुवास आठवला. तिचं मंद हसू पाहून, तिचं हास्य बघाण्याचा माझा मोह आठवला, तिच्या गालावर पडणारी खिळी आठवली. ह्या सगळ्या आठवणीने मन माझे ओथंबून गेले. पण त्यांना पिळ देऊन ते फक्तं हसू लागले. कारण गेले ते दिवस , राहिल्या फक्तं त्या आठवणी. (२) कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

दर्या खवळलायं.

इमेज
दर्या खवळलायं आत जाऊ नकोस, कुणी तरी म्हणून गेलं. त्याला काय माहीत, त्याच्या खवळण्याचे कारण मीच होतो.  माझ्या नव्या प्रेमाची इर्षा त्याला होत होती, कारण माझं पहील प्रेम तर त्यानेच नेलं होतं. तिला आपल्यात सामावून, मला त्या साल्याने पोरकं केलं होतं. तिच्या आठवणीत जगायला, त्याच मेल्यानेच मला भाग पडलं होत. आत्ताच कुठे त्या गोष्टीतून सावरून,  मला पुन्हा प्रेम झालं होतं. तरी ह्याला त्याचा पण त्रास होत होता, तिला पण आपल्यात सामवायला तो उतावळा होत होता. खवळून - खवळून तिला पण, आपल्याकडेच खेचत होता. ह्या प्रेमाला पण माझ्या पासून लांब नेऊन, परत मला एकटे करण्याचा कट त्याने रचला होता. पण त्याला काय माहीत, हे नव बंधन अतुट होतं, बुट्टी आली तरी ते तुटणार नव्हतं. दर्या खवळलाय , कुणी तरी म्हणून गेलं. त्याला काय माहीत, त्याच्या खवळयाचे कारण मीच होतो.   (२)                  कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

गुलाबी आठवणी.

इमेज
आठवणींच्या बागेत फिरून येताना, वाटेत गुलाबाचं फुल दिसलं, का कोण जाणे आपणच तोंडावर हसू उमलल. त्या गुलाबा बरोबर तुझ्या आठवणी ताज्या झाल्या, संपूर्ण बागेत आपल्याचकडे खेचत , परत - परत तुझाच विचार करायला भाग तो पाडू लागला. त्या गुलाबाच्या प्रेतेक पाकळ्या मला, तुझ्या बरोबरच्या आठवणी जाग्या करत होत्या, आपल्या सुगंधा मधून पण तुझाच सुवास तो देत होता. त्या कोमल पाकळ्यांचा स्पर्श मला, तुझ्याच स्पर्शाची आठवण करून देत होता. बागेत अनेक फुलं असली तरी, मला फक्त तोच स्पर्श हवाहवासा वाटत होता. आज ह्या गुलाबान माझं मन तृप्त केलं होत, प्रेमाच्या वाटेत काटे असले तरी, शेवट हा गोड असू शकतो, हे त्यानेच आज मला शिकवलं होतं. तुझ्या आठवणींना उजाळा देऊन , त्या आठवणींना गुलाबी आठवणी , ह्या गुलाबानेच केलं होतं.. (२)                            कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

उधार.

इमेज
उधार ठेवलेत शब्दं, कविता आता सुचणार नाही. तिने हो म्हटल्याशिवाय, प्रेमावर आता लिहिणार नाही. काय ही तिची नाटके, मला तिचं काहीही कळत नाही. शब्दं माझे उधार ठेऊन, कवितेत पण मला भेटयला ती येत नाही. माहीत असतानाही विचारत असते, कोणावर लिहितोस तू कविता. माझेच शब्दं उधार घेऊन, का करतेस माझ्याच प्रेमाची निंदा. आता वाटायला लागलेय, उगाचच दिले शब्दं उधार तुला. किंमत विसरून त्याची तू, करतेस फक्तं चेष्टा. . (२)                 कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

क्षितिज.

इमेज
दूर समुद्राच्या क्षितिजाकडेन बघून, थोडंस हसू आलं. का कोण जाणे मी मला, व तिला तिथे पाहिलं. दुरून पाहिलं तर वाटत होतं, होईल आपलं सगळं सारखं. जवळ जाऊन बघितल्यावर, कळत होतं काहीही नाही आपलं. माझं प्रेम पण त्या क्षितिजा प्रमाणे झालं होतं, वरून - वरून सगळं सुरळीत असलं तरी. आतून तर पोकळ झालं होतं, आशेच्या आधारे जगायला भाग ते पाडत होतं. पण क्षितिजाचा मोह दाखवून, आपल्याकडेच ते ओढत होतं. (२)                 कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

chance.

इमेज
चल मी आता तुझ्याशी बोलणार नाही, रुसून म्हणाली ती मला. तू फक्त chance मारतोस, माझा गालगुचा पुसत म्हणाली ती मला. काय ही तुझी नाटके, मला तुझं काहीही कळत नाही. माझ्या ओठांच चुंबन घेतल्याशिवाय, का रे तुला चैन पडत नाही. त्यावर मीच तिला म्हटलं, आता ठरलय ना लग्नं. मग कसली आलीय चिंता, मारू देना chance त्यात का होते शर्मिंदा. त्यावर थोडा विचार करत ती मला म्हणाली, आजच्या आपल्या भेटीबद्दल कोणालाही माहीत नाही रे विश्वा , काय सांगू त्यांना कुणाचे दात गालावर हे आता. अगं सांग त्यांना हा माझाच, फक्त माझाच उंदीर आहे. फक्तं थोडा उतावळा होवून, दुसऱ्या मुलींवर नाही तर, स्वतःच्याच पत्नीवर chance तो मारत आहे. (२)               कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

एकटेपणाचे धडे.

इमेज
चल विसर मला आता, रडक्या स्वरात ती मला म्हणाली. आपलं प्रेम एवढच होतं, डोळ्यात  आसवंसाठवित ती मला म्हणाली. जमणार नाही आपलं, मी तुला पहिलच म्हटलं होतं. प्रेमात माझ्या पडू नको, मी तुला कितीदा सांगितलं होतं. मला माहीत आहे, आता आवरणं कठीण झालंय, तरी तुला आवरावं लागेल. जे कटू सत्य आहे, ते तुला स्वीकारावंच लागेल. मला आता सवय झाली आहे, तू पण सवय करून घे. एकटेपणाने कसे जगायचे, त्याचे धडे माझ्याकडूनच शिकून घे. (२)               कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

स्वप्न.

इमेज
आज लाल साडीत ती, भलतीच खूप Cute दिसत होती. माझ्या मनातल्या सगळ्या विचारांना Mute करून, आपल्याकडेच ती ओढत होती. तिला पाहून असं वाटत होतं की , हळूच घ्यावं ओढून तिला कवेत माझ्या. ती काही बोलण्याआधीच, परत घट्ट मिठी मारावी तिला. कोण बघत नाही हे पाहून, हळूच करावा Romance थोडा. काय करू मित्रानो , आपलं नशीबच सगळं फुटक होतं. इतक्यात स्वप्न तुटलं, अलारामने हे प्रेम पण पाण्यात पाडलं.. (२)                                कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

कविता.

इमेज
चल हाथ सोड माझा, रागाच्या भरात ती मला म्हणाली. तू दुसऱ्यावर कविता लिहायला लागलाय, असं म्हणत माझ्यावर जाम भडकली. काय सांगू ग सखे तुला, मीच तिला म्हणालो. कविता मी कोणावरही लिहिली असू, प्रेम तर तुझ्यावर मी केलं. माझी मिठी, माझे हृदय, फक्त तुझीच वाट पाहातेय गं, फक्त कानोसा देऊन ऐक, माझ्या हृदयाचे ठोके पण तुझेच गीत गातेय गं. लाजत ती मला म्हणाली, मग माझ्या वर पण कविता लिही ना. त्यावर मीच तिला म्हणालो, काय लिहू गं सखे , काहीच कळत नाही . आपलं आभाळा सारखं प्रेम ह्या कवितांमध्ये, काहीही केल्या समावत नाही  (२)                  कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

आठवणी.

इमेज
आज आठवतेय गं , आपली कॉलेज मधली पहिली भेट, तुझी माझ्या आयुष्यात झालेली Entry थेट. खरं सांगायचं झालं तर , तू मला दिसतात क्षणी भावली होती, आपली मैत्री भलेही झाली नसली तरी, तू मला फार आवडली होती. काय होता तुझा तो रुबाब, काय तुझ्या त्या अदा. काय तुझे ते मोत्यासारखे डोळे, अमृतापरी रसाळ तुझे ते ओठ. लाल - लाल कोमल तुझे ते गाल, हवेमध्ये ऊडणारे तुझे ते बाल. सगळंच मला घाळ्याळ करत होते, आपल्या प्रेमाच अंकुर , तिथेच कुठे तरी पेरले गेलं होतं. पण काळानेच सगळा घात केला, तुलाच तो माझ्यापासून दूर घेऊन गेला. तू माझीच होती पण, माझी कधीच झाली नाही. आपलं प्रेम की Crush समजण्याआधीच, तू दुसऱ्या बरोबर निघून गेली होतीस. नकळत तू केलेल्या जखमा भरताना, आजही तुझ्या पैंजणाचा आवाज, माझ्या कानात घुमतोय गं . तुझ्या आठवणी बरोबर तोही, कानफडीत मारतोय गं .. (२)                        कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

आठवणी.

इमेज
काय करू ग सखे, काही कळत नाही, तुझ्या आठवणी स्वस्त बसू देत नाही. डोळे बंद केले तरी, तुझेच रूप दिसते समोर. कंठ दाटून येऊन, उगाचच डोळे येतात भरून. तू निघून गेली तसा माझा आत्माही निघून गेलाय ग सखे. काय करू ग सखे, काही कळत नाही, तुझ्याविणा मन माझे कुठेच रमत नाही. आज आठवतंय ग, तुझं माझ्याबरोबरच भांडणं, भांडूण तुझा सगळा वर्ग डोक्यावर घेणं. रागाने मला तू गाढव - माकड म्हणणं, व मग उगाचच तुझं माझ्यावर रुसून बसणं. त्यावर माझं तुला convince करणं, Surprise Gifts देऊन तुला परत हसवणं. पण आज त्या हसण्या- रुसण्याला काही अर्थ राहीलेला नाही. काय करू ग सखे, काही कळत नाही, तुझ्या आठवणी शब्दांना मुके बसू देत नाही. (२)                       कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

तो.

इमेज
मी काही बोलत नाही, तरी तो माझे हावभाव समजत असतो. मी कितीही संकटात असलो तरी, कणा बनून तो सतत पाठी उभा असतो. मी कितीही धडपडलो तरी, जखमा माझ्या स्वतः वर तो घेत असतो. माझ्या दुःखात सहभागी हऊन, मला सावरून स्वतः तोच अश्रू गाळीत असतो. पैसे जरी संपले माझे, आपणहून माझे पैसे तोच देत असतो. Off road गेलेली माझी गाडी, तोच On the road आणत असतो. आयुष्याला नवी दिशा देऊन, अंधारात पण दिवा तोच दाखवीत असतो. तो माझा बाप नसतो, नसतो तो माझा भाऊ. आपल्या मैत्रीतून मैत्रीचा खरा अर्थ शिकवणारा, तो माझाच मित्र असतो. तो माझाच मित्र असतो.                        कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

म्हणून नाही Propose केलं मी तिला.

इमेज
खूप आवडायची ती मला, पण सांगण्याची हिम्मत कधी झाली नाही, म्हणून नाही Propose केलं मी तिला. वाटले तिची माझी मैत्री तुटेल, ती WhatsApp वर Block करून, Facebook वर Unfriend करेल, म्हणून नाही Propose केलं मी तिला. तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, ती चक्क शाकाहारी, मी मत्स्यशिवाय कसा राहील, म्हणून नाही Propose केलं मी तिला. आपल्या जाती- पाती वरून दंगल उठतील, आई- वडील माझ्याबद्दल काय विचार करतील, म्हणून नाही Propose केलं मी तिला. मग तिनेच मला आपला भाऊ केला, राखी बांधून स्वप्नांचा सगळा चक्कचूर केला, म्हणून हृदयावर टाचे मारून, नाही Propose केलं मी तिला. उगाचच  मग स्वतःची समजूत काढत राहिलो, की "तीच Propose करेल मला",  "तीच Propose करेल मला". कारण "आवडतो मी तिला ",  "आवडतो मी तिला ".                                      कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

माणसांना शोधत आहे.

इमेज
गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. हृदयाच्या Hard-disk मध्ये मन गुंतवून, माणुसकीच्या Virusला Antivirus शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. डोक्याचा CPU Update वरती टाकून, Hang झालेल्या माणुसकीला Boost करत आहे. Battery जरी संपली तरी त्याची, Charging cord साठी electricityची साथ शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. माणुसकीला Google वरती टाकून, Playstore वरून त्याचा App घेत आहे. DP जरी बदलला त्याने, त्याचा खरा चेहरा अंधारात पण शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. Delete झालेली माणुसकी, Recycling bin मधून बाहेर काढत आहे. वेडापिसा होऊन, वड्यापिशांना शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. (२)                                   कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

चौकीदार.

इमेज
उघड्या झाल्या वाटा, उघडी झाली दारे, निवडणुकीने दमदमले हे रणफुंकारे. आत्ताच कुठे हा घोर पाऊस दाटून आला, काळ्या नभातून सोनेरी किरणांनी हवेमध्ये उडाला. मदारीच आत्ता नव- नृत्य करत आहे, माकडाला लजवूनी पक्षांतरे तो करत आहे. रावणाचा शत्रू आत्ताच मित्र झाला आहे, सीता तिथेच सोडून फक्त उनाडक्या करत आहे. टोप्या पण बदल्यात, रंग पण बदलत आहे, सिंहाला ठार करण्यासाठी कमळ सुद्धा डंक मारत आहे. पैसाच हा आत्ता सगळा, नवा खेळ खेळत आहे. जनतेला वेठीस धरून, रणफुंकारे तो फुंकत आहे. पण फुंकाऱ्याचा वारा आत्ता , उलट दिशेने वाहत आहे, सत्तेचा नाद त्याच्याच अंगलट येत आहे. कारण चौकीदार चोर आणि चोरच राहत आहे. (२)                     कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

तेच ते.

इमेज
तिच बस, तेच लोक, तीच गर्दी, तेच भोग. तिच कॉलेज, त्याच मुली, दहिमध्ये तुप लोणी. तोच विषय, तेच टेन्शन, हजेरी शिवाय नाही व्यंजन. तेच प्रेम, तेच आकर्षण, स्वप्नसुद्धा झाले भंजन. तीच धावपळ, तीच पळापळ, बंद पडून गेलंय "जीवन". तरी, सगळीकडे तेच ते , तेच ते आणि तेच ते.                    कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

Techno women.

इमेज
माझी आई Techno women झाली आहे, रोज  नव - नवीन Technology ती वापरत आहे. Technology कुठलीही असू ,  कसं वापरायचं ते तील तोंडपाठ आहे. या Technology युगात, माझ्या बरोबर हातात - हाथ घालून ती चालत आहे. ती कितीही Technology बरोबर धावत असली तरी, माझं Hang पडलेलं जीवन, तीच तर सावरत आहे, तीच तर सावरत आहे.                       कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

प्रेम.

इमेज
दगदगत्या जीवनातून वेळ काढून, आज मी तीला प्रपोझ केल, तीने लाजून हो म्हणून उत्तर दिलं. मी मनाशीच म्हणलो, चल दोस्ता, ही तर पटली, माझ्या प्रेमात ही तर फसली. मनानेच आतून उत्तर दिलं, प्रेम हे नसत फसवा - फसवीच, ते असत जन्मोजन्मंतरीच. नसतात त्याला कुठलीही बंधने, नसते त्याला कुठलीही जात. अरे मित्रा, प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.   कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

पहीलं प्रेम.

इमेज
निळ्याशार आकाशाला पाहुन, मनसोक्त उडावस वाटत. अथांग वाहणाऱ्या ह्या, प्रेमाच्या समुद्रात बुडावस वाटत. पहील प्रेम हे सर्वांनाच होत, ते प्रेम जपावस वाटत. अभिमन्यू प्रमाणे ह्या प्रेमाच्या, चक्रव्यूहात आपणही शिरावस वाटत. स्वप्नांप्रमाणे खऱ्या आयुष्यात, तीला प्रपोझ करावस वाटत. कवितेव्दारे माझ नाव, ह्रदयात तिच्या काेरावस वाटत.                       कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

एकटेपणा.

इमेज
तू एकटी कधीच नव्हती, तुझी तो सतत आठवण काढत असतो. एकटेपणात का होईना, तो तुझेच गीत गुणगुणत असतो. गीता मधल्या शब्दांमध्ये, तूच त्याला दिसत असते . एकटेपणाच्या काळोखात, तूच त्याला हवी असते. एकटे - एकटे म्हणून, किती दिवस जगायचं. ह्या एकटेपणाला, तूच आता आवरायचं...(2)                     कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

तु आणि मी.

इमेज
अगं प्रिये, तु पाऊस , मी धारा, तु नक्षत्रे , मी तारा, तु हवा , मी वारा, तुझ्या, माझ्या भेटीत पडतील ग आकाशातून गारा, किती वेळ लावशील ग नटायला, वाजलेत बघ घडळ्यात दुपारची साडेबारा.            कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

मी प्रेमवेडा.

इमेज
भिती वाटते ग प्रेमात पडण्याची, तुझ्या आणि फक्त तुझ्याच स्वप्नात गुंतण्याची. पण सवय झालीय ग तुझ्यासाेबत बाेलण्याची, त्या बाेलण्यात माझा तणाव विसरण्याची. खुप काही सांगायच असत ग तुला, पण सवय झालीय तुला पाहताच देहभान विसरण्याची. मी प्रेमवेडा झालाेय ग तुझ्या प्रेमात, मला घाई असते तुला मिठीत घेण्याची. मी फक्त तुझा आणि तुझाच आहे ग, इच्छा आहे तुझ्यासाेबत संसार ठाटण्याची. मी तुला साेडून कधीही जाणार नाही ग, शपत आहे मला तुझ्याच प्रेमाची.                              कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी.

इमेज
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, एक समजून घेणारी सखी मिळावी. स्वप्नात तशा असंख्य मुली भेटतात, खऱ्या आयुष्यात एक तरी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, माझे प्रेम समजून घेणारी बायकाे मिळावी. राेज तशा असंख्य मुली भेटतात, एक अफाट प्रेम करणारी प्रियसी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, माझ्या साेबत हातात हात घालून चालणारी मैत्रिण मिळावी. राेज तशा अनेक मी तुझी बहीण म्हणारी भेटतात, तु माझा भाऊ नाहीस प्रियकर आहेस म्हणारी एकतरी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, मी खचलाे की धिर देणारी बायकाे मिळावी. ती गाेरी नसली तरी चालेल, माझा साथ जीवनाच्या कुठल्याच क्षणाला न साेडणारी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, एक समजून घेणारी सखी मिळावी.                          कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

प्रेमाचा पाऊस.

इमेज
अस वाटत की, बघत राहव तीला, चिंब भिझताना पावसात. ओठांना ओठ टेकवून, करावा थाेडासा राेमांस, त्या थंडगार पावसात. त्याचक्षणी तिथेच, कराव तिला प्रपाेझ , त्या माेहीत पावसात. मिठीत उचलून घ्याव तीला, ह्या प्रेमाच्या उबदार पावसात.                           कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

खून.

इमेज
रोज सकाळी रक्ताने माखलेले, वर्तमानपत्र येते माझ्या घरात. दरराेज त्याच बातम्या , तेच समाचार, त्याच घटना, तेच कुविचार, माहीत नाही आज काेणी केलाय, काेणाचं शाेषण. पण झालाय खून भावनांचा, माझ्या आणि तुमच्याही.                  कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

प्रेम.

इमेज
आज पुन्हा वाटत, प्रेमात पडाव तिच्या. घ्यावा मऊ- मऊ गालांचा, गाेड-गाेड गालगुचा तिच्या. घालावा हार खऱ्या, नक्षत्रांचा गळ्यात तिच्या. शिराव माेहीत डाेळ्यातून, रंगदार स्वप्नात तिच्या. चिंब भिझाव पावसात, मोरासारख साेबत तिच्या. काेराव माझ नाव, कवितेव्दारे ह्रदयात तिच्या.          (2)                       कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

प्रेम.

इमेज
जमणार नाही आपल, आज मला कळल. ती माझी प्रियसी नव्हतीच, हे गुपीत आज उलगडल. बहीण-भावाच्या बंधनात, तिने आज मला अडकवल. तिच्या एकतर्फी प्रेमात, हाेत माझ मन भरकटल. प्रेम ह्या शब्दाचा अर्थ, तिच्या वागण्यातून आज मला उमगल.                          कवि -विश्वनाथ पै भाटीकर.