आठवणी.

आज आठवतेय गं ,
आपली कॉलेज मधली पहिली भेट,
तुझी माझ्या आयुष्यात झालेली Entry थेट.

खरं सांगायचं झालं तर ,
तू मला दिसतात क्षणी भावली होती,

आपली मैत्री भलेही झाली नसली तरी,
तू मला फार आवडली होती.

काय होता तुझा तो रुबाब,
काय तुझ्या त्या अदा.

काय तुझे ते मोत्यासारखे डोळे,
अमृतापरी रसाळ तुझे ते ओठ.

लाल - लाल कोमल तुझे ते गाल,
हवेमध्ये ऊडणारे तुझे ते बाल.

सगळंच मला घाळ्याळ करत होते,
आपल्या प्रेमाच अंकुर ,
तिथेच कुठे तरी पेरले गेलं होतं.

पण काळानेच सगळा घात केला,
तुलाच तो माझ्यापासून दूर घेऊन गेला.

तू माझीच होती पण,
माझी कधीच झाली नाही.

आपलं प्रेम की Crush समजण्याआधीच,
तू दुसऱ्या बरोबर निघून गेली होतीस.

नकळत तू केलेल्या जखमा भरताना,
आजही तुझ्या पैंजणाचा आवाज,
माझ्या कानात घुमतोय गं .

तुझ्या आठवणी बरोबर तोही,
कानफडीत मारतोय गं .. (२)

                       कवि- विश्वनाथ पै भाटीकर.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.