GMC मधील ती.

पांढरा कोर्ट 
लाल - लाल ओठ
सोनपरी माझ्या समोर आली
I will check your pulse rate
गालातल्या गालात हसत म्हणाली

Hmm it's too fast ती उद्गारली
तीला काय माहीत तीच्या स्पर्शाने 
माझ्या हृदयाची रेल्वेच घसरली

मी वेड्यापरी तीलाच न्याहाळत लागलो
डॉक्टर पण इतकी Hot असू शकते 
हे मला त्या दिवशी कळालं 

Are you feeling ok ?
तीने तंद्री तोडीत विचारले
मी जरा बेशुद्धपणाची 
नाटकं करू लागलो

ती जराशी घाबरली 
माझ्या शर्टाचे बटन उघडून 
मला पुन्हा तपासू लागली 

मनात माझ्या अनेक विचार येत होते
काय तीची शरीर रचना
करावा का थोडासा रोमान्स 
असे अनेकदा वाटत होते

मी तीला एकटक पाहतोय
हे तीला कळालं 
माझ्या कानफटीत लावून 
तीने वासनेचं भुत उतरवलं

GMC मधील ती 
आता फक्त कवितेत राहीली
त्या दिवसानंतर आजपर्यंत तीने
माझ्याकडे पाठ फिरवली 

GMC मधील ती 
आता फक्त कवितेत राहीली (२) 

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

मनातले मला आज सांगायचे होते.