मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी.
मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी
युनिव्हर्सिटीच्या वर्गात भेटलो
चंद्र तारे सगळे फिके
मी अप्सरेच्या प्रेमात पडलो
युनिव्हर्सिटीच्या वर्गात भेटलो
चंद्र तारे सगळे फिके
मी अप्सरेच्या प्रेमात पडलो
तशी आमची मैत्री जुनी
त्याला नवीन अंकुर फुटलं
स्वप्नात घेऊन तीला कुशीत
आमचं प्रेम तीथेच कुठंतरी फुललं
भाषा आपल्या वेगळ्या तरी
हृदयाचं गणित तीने बिघडवलं
नक्षेदार डोळ्यांच्या तीच्या हाकेने
कोंकणी - मराठीचं मिलन घडवलं
मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी
M.A पुर्ण करता एकामेकांच्या प्रेमात पडलो
भाषा, जात, धर्म या पलीकडे प्रेम असतं
हे आम्ही सगळ्या जगाला शिकवलं
मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी
एकामेकांच्या प्रेमात पडलो (२)
कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा