तो.

मी काही बोलत नाही,
तरी तो माझे हावभाव समजत असतो.

मी कितीही संकटात असलो तरी,
कणा बनून तो सतत पाठी उभा असतो.

मी कितीही धडपडलो तरी,
जखमा माझ्या स्वतः वर तो घेत असतो.

माझ्या दुःखात सहभागी हऊन,
मला सावरून स्वतः तोच अश्रू गाळीत असतो.

पैसे जरी संपले माझे,
आपणहून माझे पैसे तोच देत असतो.

Off road गेलेली माझी गाडी,
तोच On the road आणत असतो.

आयुष्याला नवी दिशा देऊन,
अंधारात पण दिवा तोच दाखवीत असतो.

तो माझा बाप नसतो,
नसतो तो माझा भाऊ.

आपल्या मैत्रीतून मैत्रीचा खरा अर्थ शिकवणारा,
तो माझाच मित्र असतो.
तो माझाच मित्र असतो.

                       कवि- विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.