मी मेल्यावर.

आभाळदाटून पाऊस 
अविरत पडू लागला
मी मेल्यावर 
ग्रह इतकी काय बदलली
पुर आला पण जमीन कोरडीच राहीली

मी मेल्यावर
शरीर थंड पडेल
हृदयाची टीक टीक बंद होईल
कोणी अलाराम प्रमाणे हंबरडा फोडेन
मी फक्त कान बंद करून झोपी जाईल

मी मेल्यावर
सुवासिक फुलांनी मला सजवले जाईल
अत्तराचा सुगंध इतका होईल की 
चितेची आग लगेच शमली जाईल

मी मेल्यावर
बाबा गेले आई गेली 
मित्र सवंगडी सगळे गेले
भुतांबरोबर मला एकटे सोडून
साले गर्दीतले मुखवटेवाले गेले

मी मेल्यावर 
हाडांचे सांगाडे नदीवर गेले
घेऊन अश्रूंच्या पोटली
वाहून दिल्या त्या आठवणी 
सुकलेल्या नदी तीरी

मी मेल्यावर
राहील्या फक्त आठवणी
पुस्तकाच्या पानांप्रमाणे फाडल्या जातील
मी असेन खूप दुर
काही नक्षत्रामध्ये माझा शोध घेतील

मी मेल्यावर
स्मृती माझ्या पुसल्या जातील
चार दिवस काय ते रडणे
मग सगळे आपल्या कामात मिश्किल होतील

मी मेल्यावर हो, मी मेल्यावर
वरील सगळे काही घडून जाईल
माझी ही अर्धवट कविता तेव्हा पुर्ण होईल
मी मेल्यावर हो, मी मेल्यावर (२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.