उधार.

उधार ठेवलेत शब्दं,
कविता आता सुचणार नाही.

तिने हो म्हटल्याशिवाय,
प्रेमावर आता लिहिणार नाही.

काय ही तिची नाटके,
मला तिचं काहीही कळत नाही.

शब्दं माझे उधार ठेऊन,
कवितेत पण मला भेटयला ती येत नाही.

माहीत असतानाही विचारत असते,
कोणावर लिहितोस तू कविता.

माझेच शब्दं उधार घेऊन,
का करतेस माझ्याच प्रेमाची निंदा.

आता वाटायला लागलेय,
उगाचच दिले शब्दं उधार तुला.

किंमत विसरून त्याची तू,
करतेस फक्तं चेष्टा. . (२)

                कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.