मासिक पाळी. ( Periods)
माझा आवडता लाल रंग
त्या दिवसात मला आवडत नाही
वेदना माझ्या त्या दिवसाच्या
काही केल्या लपवत नाही
बाईचा जन्म माझा म्हणून
टोमणे मला सहन होत नाही
शुध्द - अशुध्द अशी कशी मी झाले
हे गणित मला उमजत नाही
हात - पाय गळून पोट दुखणे
हे अनेकदा सहन होत नाही
मासिक पाळी प्रत्येक महिन्याला का येते
या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही
गणेश चतुर्थीला आला नंबर
तर मन कुठेच काही रमत नाही
देवाने दिलेले हे वरदान
त्या दिवसात काही पटत नाही
बाळंपणीला होते स्तुती पण
मासिक पाळीचे दु:ख समजत नाही
अंकुर हे माझ्या पोटातील बीजानं फुलतं
हे काही केल्या लोकांना कळत नाही
पॅडच्या जागी कधी कपड्याला लागलं
तर Awkward feeling लपवत नाही
मासिक पाळी विषयीची अशिक्षिकता
अजून काही केल्या जात नाही
सांगितले दुःख मी माझ्या भावाला
म्हणून काय ते कमी होत नाही
पाच दिवस मासिक पाळीचे
कधी - कधी मला आवडत नाही (२)
कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
Best khup khup chan
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌
Khup chhan kavita aahe sir,,,,,,,Thanku,,,,,,directly tumhi strayanchi bhavana samjun ti mandli,,,,,,sarvanna tya samajat nhi,,,,,good luck
हटवाKhup sundar kavyarachna🥰ashyach sundar sundar kavita karat raha 😊
उत्तर द्याहटवाKhupach chan 😍👌🏻👌🏻apratim❤️
हटवाKhup sundar..😊
उत्तर द्याहटवाIt really good 🥰🥰🥰
उत्तर द्याहटवाअप्रतिम कविता 😍
उत्तर द्याहटवाThis is really good. Keep them coming.
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लिहिलंय. मला वाटतं प्रत्येकाने हि कविता वाचायला व समजून घ्यायला हवी.
उत्तर द्याहटवा