उमलत्या कळ्यांना आवरा.

उमलत्या कळ्यांना आवरा 
त्यांची नीट काऴजी घ्या
त्यांचं रक्षण करा..
कारण
वातावरण दुषित आहे,
विषारी ‌आहे.

नाही तर त्यांना फुलूच देऊ नका
उगाच त्यांना दु:ख नको..

लवकर निर्णय घ्या...
समाजात राक्षसांची फौज फिरत आहे
त्यांची वाकडी नजर पडण्या आधिच काही तरी करा..

उमलत्या कळ्यांना आवरा..
समजा‌ आवरणं जमत नसेल तर
राक्षसांना तोंड द्या..

उगाच मेणबत्ती फिरवली म्हणून
तो‌ मरणार नाही..
हिंमत असेल तर जा त्याचा घात करा , अंत‌ करा
तुमच्यातील देवीला जाग करा..

निर्णय तुमच्या हातात आहे..
विचार ‌करा...

नाहीतर उमलत्या कळ्यांना आवरा..

कवि- विश्वनाथ पै भाटीकर.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.