मासिक पाळी. ( Periods)
माझा आवडता लाल रंग त्या दिवसात मला आवडत नाही वेदना माझ्या त्या दिवसाच्या काही केल्या लपवत नाही बाईचा जन्म माझा म्हणून टोमणे मला सहन होत नाही शुध्द - अशुध्द अशी कशी मी झाले हे गणित मला उमजत नाही हात - पाय गळून पोट दुखणे हे अनेकदा सहन होत नाही मासिक पाळी प्रत्येक महिन्याला का येते या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही गणेश चतुर्थीला आला नंबर तर मन कुठेच काही रमत नाही देवाने दिलेले हे वरदान त्या दिवसात काही पटत नाही बाळंपणीला होते स्तुती पण मासिक पाळीचे दु:ख समजत नाही अंकुर हे माझ्या पोटातील बीजानं फुलतं हे काही केल्या लोकांना कळत नाही पॅडच्या जागी कधी कपड्याला लागलं तर Awkward feeling लपवत नाही मासिक पाळी विषयीची अशिक्षिकता अजून काही केल्या जात नाही सांगितले दुःख मी माझ्या भावाला म्हणून काय ते कमी होत नाही पाच दिवस मासिक पाळीचे कधी - कधी मला आवडत नाही (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
Thanks 😊
उत्तर द्याहटवा