परिस्थिती मनाची.

धीर - गंभीर मन माझे,
चलबिचल होत आहे.

सकारात्मक विचारांपेक्षा मनामध्ये,
नकारात्मक विचार जास्त घुमत आहे.

कसं आवरु ह्या वात्रट मनाला,
डोकं सगळं बधीर होत आहे.

वाढते कोरोना व्हायरसचे पेशंट बघून,
हृदयाचे ठोके वर-खाली होत आहे.

सरण पेटले आहे, मरण बोलवत आहे असे,
नको नको ते विचार मनामध्ये येत आहे.

चलबिचल मन‌ माझे‌ आता,
माझ्या आवाक्याबाहेर जात आहे.

मला तर‌ नाही ना होणार कोरोना?
असा प्रश्न ते परत-परत विचारत आहे.

पण परिस्थिती ही घाबरलेल्या मनाची,
हळूहळू सुधारू लागली आहे.

बरे होतात कोरोनाचे रूग्ण,
अशी सकारात्मक बातमी जी आली आहे.

पण सावरलेले मन‌ माझे आता,
वेड्या मुलापरी‌ वागत आहे.

कधी जाणार तू कोरोना?
आता तरी जा ना तू प्लीज,
अशी विनवणी तो‌ त्यालाच करत आहे. (२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.