कावळा.

खूप पोटात दुखतयं गं आई 
माझ्या बहिणीने आईला सांगितलं
काय झालंय गं बहिणीला मी तीला विचारलं
तीला आज कावळ्यानं शिवलं
जवळ जाऊ नकोस ती उद्गारली

आत्ता तर मी तीच्या जवळपास
एकपण कावळा हींडू देत नाही
मी असतानाही कसा शिवला कावळा 
गुढ काही उलगडत नाही 

कधीतरी मला पण शिवेल कावळा
म्हणून मी आता अंगप्रदर्शन करत आहे
फक्त पुरुषांनाच अंगप्रदर्शनाचा हक्क असतो का?
साऱ्या जगाला प्रश्न विचारत आहे

वासना पुरुषांच्या डोळ्यात असते की डोक्यात
हेच मला समजत नाही
लाज, शरम व अब्रू कुठे त्यांनी विकली
उत्तर काही मिळत नाही (२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.