हरवलेत शब्द.

हरवलेत शब्द कुठेतरी,
मला भेटत पण नाहीत.

काळोखानंतर उगवणार सूर्य,
याची शाश्वती मला दिसत नाही.

एवढं काय म्हणून घडलं,
मला काहीच उमजत नाही.

करून मला पोरकं वांझ,
कविता मला भेटायला येत नाही.

डोकं झालय सगळं‌ सुन्न,
एक शब्दसुद्धा सुचत नाही.

प्रेम, समाज, निसर्ग विषयक
शब्द काहीच बोलत नाही.

कुठे हरवलय रे मी मित्रा तुला,
माझ्या आतला कवी मला सापडत नाही.

नाळ माझी आणि तुझी तुटली अशी,
काही केल्या परत जोडत नाही.

रडून- रडून पोखळ झालोय मी आतून,
तरी दुःख‌ माझे त्याला समजत नाही.

मरत नसतो कवी कुठलाच,
हे‌ बोलसुद्धा कानाला समाधान देत नाही.

आत्मा कसा माझा भरकटला असा,
काही केल्या माझ्या आत तो येत नाही.

आत्ता शेवटची एकच ईच्छा राहिली आहे,
तिला पण हा दुरावा सहन होत नसेल.

कदाचित हरवलेत जरी शब्द मी,
ती मला असं एकटं सोडून जाणार नाही.(२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.