म्हणून केली नाही आत्महत्या.

हिंमत होत नाही माझी
स्वतःला लटकवून घ्यायची 
पुलावरून नदीत उडी टाकायची
हाताची नस कापण्याची
म्हणून केली नाही आत्महत्या

भिती वाटते मला माझी
मी गेल्यावर होणाऱ्या परीस्थितीची 
आई- वडीलांच्या वाढत्या वयाची
बहीणीच्या होऊ घातलेल्या लग्नाची
म्हणून केली नाही आत्महत्या

लाज वाटते मला माझी
एवढ्या लवकर हार मानली त्याची
चार दिवस दु:खाचे काढू शकलो नाही त्याची
कष्ट करण्यास आळसपणा केला त्याची
म्हणून केली नाही आत्महत्या

शेतकरी राजा घामाने अन्न पिकवतो
दिवा वाऱ्यात पण तेवत राहतो 
गरीब कष्टाने परीस्थितीशी लढतो
तीच ताकत माझ्यात पण येईल
म्हणून केली नाही आत्महत्या

होईल सगळं सारखं
जाईल दुःखाचे क्षण 
येईल सोनेरी दिवस
हीच आशा मनात फुंकून 
केली नाही आत्महत्या (२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.