पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविता.

इमेज
चल हाथ सोड माझा, रागाच्या भरात ती मला म्हणाली. तू दुसऱ्यावर कविता लिहायला लागलाय, असं म्हणत माझ्यावर जाम भडकली. काय सांगू ग सखे तुला, मीच तिला म्हणालो. कविता मी कोणावरही लिहिली असू, प्रेम तर तुझ्यावर मी केलं. माझी मिठी, माझे हृदय, फक्त तुझीच वाट पाहातेय गं, फक्त कानोसा देऊन ऐक, माझ्या हृदयाचे ठोके पण तुझेच गीत गातेय गं. लाजत ती मला म्हणाली, मग माझ्या वर पण कविता लिही ना. त्यावर मीच तिला म्हणालो, काय लिहू गं सखे , काहीच कळत नाही . आपलं आभाळा सारखं प्रेम ह्या कवितांमध्ये, काहीही केल्या समावत नाही  (२)                  कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

आठवणी.

इमेज
आज आठवतेय गं , आपली कॉलेज मधली पहिली भेट, तुझी माझ्या आयुष्यात झालेली Entry थेट. खरं सांगायचं झालं तर , तू मला दिसतात क्षणी भावली होती, आपली मैत्री भलेही झाली नसली तरी, तू मला फार आवडली होती. काय होता तुझा तो रुबाब, काय तुझ्या त्या अदा. काय तुझे ते मोत्यासारखे डोळे, अमृतापरी रसाळ तुझे ते ओठ. लाल - लाल कोमल तुझे ते गाल, हवेमध्ये ऊडणारे तुझे ते बाल. सगळंच मला घाळ्याळ करत होते, आपल्या प्रेमाच अंकुर , तिथेच कुठे तरी पेरले गेलं होतं. पण काळानेच सगळा घात केला, तुलाच तो माझ्यापासून दूर घेऊन गेला. तू माझीच होती पण, माझी कधीच झाली नाही. आपलं प्रेम की Crush समजण्याआधीच, तू दुसऱ्या बरोबर निघून गेली होतीस. नकळत तू केलेल्या जखमा भरताना, आजही तुझ्या पैंजणाचा आवाज, माझ्या कानात घुमतोय गं . तुझ्या आठवणी बरोबर तोही, कानफडीत मारतोय गं .. (२)                        कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

आठवणी.

इमेज
काय करू ग सखे, काही कळत नाही, तुझ्या आठवणी स्वस्त बसू देत नाही. डोळे बंद केले तरी, तुझेच रूप दिसते समोर. कंठ दाटून येऊन, उगाचच डोळे येतात भरून. तू निघून गेली तसा माझा आत्माही निघून गेलाय ग सखे. काय करू ग सखे, काही कळत नाही, तुझ्याविणा मन माझे कुठेच रमत नाही. आज आठवतंय ग, तुझं माझ्याबरोबरच भांडणं, भांडूण तुझा सगळा वर्ग डोक्यावर घेणं. रागाने मला तू गाढव - माकड म्हणणं, व मग उगाचच तुझं माझ्यावर रुसून बसणं. त्यावर माझं तुला convince करणं, Surprise Gifts देऊन तुला परत हसवणं. पण आज त्या हसण्या- रुसण्याला काही अर्थ राहीलेला नाही. काय करू ग सखे, काही कळत नाही, तुझ्या आठवणी शब्दांना मुके बसू देत नाही. (२)                       कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

तो.

इमेज
मी काही बोलत नाही, तरी तो माझे हावभाव समजत असतो. मी कितीही संकटात असलो तरी, कणा बनून तो सतत पाठी उभा असतो. मी कितीही धडपडलो तरी, जखमा माझ्या स्वतः वर तो घेत असतो. माझ्या दुःखात सहभागी हऊन, मला सावरून स्वतः तोच अश्रू गाळीत असतो. पैसे जरी संपले माझे, आपणहून माझे पैसे तोच देत असतो. Off road गेलेली माझी गाडी, तोच On the road आणत असतो. आयुष्याला नवी दिशा देऊन, अंधारात पण दिवा तोच दाखवीत असतो. तो माझा बाप नसतो, नसतो तो माझा भाऊ. आपल्या मैत्रीतून मैत्रीचा खरा अर्थ शिकवणारा, तो माझाच मित्र असतो. तो माझाच मित्र असतो.                        कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

म्हणून नाही Propose केलं मी तिला.

इमेज
खूप आवडायची ती मला, पण सांगण्याची हिम्मत कधी झाली नाही, म्हणून नाही Propose केलं मी तिला. वाटले तिची माझी मैत्री तुटेल, ती WhatsApp वर Block करून, Facebook वर Unfriend करेल, म्हणून नाही Propose केलं मी तिला. तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, ती चक्क शाकाहारी, मी मत्स्यशिवाय कसा राहील, म्हणून नाही Propose केलं मी तिला. आपल्या जाती- पाती वरून दंगल उठतील, आई- वडील माझ्याबद्दल काय विचार करतील, म्हणून नाही Propose केलं मी तिला. मग तिनेच मला आपला भाऊ केला, राखी बांधून स्वप्नांचा सगळा चक्कचूर केला, म्हणून हृदयावर टाचे मारून, नाही Propose केलं मी तिला. उगाचच  मग स्वतःची समजूत काढत राहिलो, की "तीच Propose करेल मला",  "तीच Propose करेल मला". कारण "आवडतो मी तिला ",  "आवडतो मी तिला ".                                      कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

माणसांना शोधत आहे.

इमेज
गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. हृदयाच्या Hard-disk मध्ये मन गुंतवून, माणुसकीच्या Virusला Antivirus शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. डोक्याचा CPU Update वरती टाकून, Hang झालेल्या माणुसकीला Boost करत आहे. Battery जरी संपली तरी त्याची, Charging cord साठी electricityची साथ शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. माणुसकीला Google वरती टाकून, Playstore वरून त्याचा App घेत आहे. DP जरी बदलला त्याने, त्याचा खरा चेहरा अंधारात पण शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. Delete झालेली माणुसकी, Recycling bin मधून बाहेर काढत आहे. वेडापिसा होऊन, वड्यापिशांना शोधत आहे. गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. (२)                                   कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

चौकीदार.

इमेज
उघड्या झाल्या वाटा, उघडी झाली दारे, निवडणुकीने दमदमले हे रणफुंकारे. आत्ताच कुठे हा घोर पाऊस दाटून आला, काळ्या नभातून सोनेरी किरणांनी हवेमध्ये उडाला. मदारीच आत्ता नव- नृत्य करत आहे, माकडाला लजवूनी पक्षांतरे तो करत आहे. रावणाचा शत्रू आत्ताच मित्र झाला आहे, सीता तिथेच सोडून फक्त उनाडक्या करत आहे. टोप्या पण बदल्यात, रंग पण बदलत आहे, सिंहाला ठार करण्यासाठी कमळ सुद्धा डंक मारत आहे. पैसाच हा आत्ता सगळा, नवा खेळ खेळत आहे. जनतेला वेठीस धरून, रणफुंकारे तो फुंकत आहे. पण फुंकाऱ्याचा वारा आत्ता , उलट दिशेने वाहत आहे, सत्तेचा नाद त्याच्याच अंगलट येत आहे. कारण चौकीदार चोर आणि चोरच राहत आहे. (२)                     कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

तेच ते.

इमेज
तिच बस, तेच लोक, तीच गर्दी, तेच भोग. तिच कॉलेज, त्याच मुली, दहिमध्ये तुप लोणी. तोच विषय, तेच टेन्शन, हजेरी शिवाय नाही व्यंजन. तेच प्रेम, तेच आकर्षण, स्वप्नसुद्धा झाले भंजन. तीच धावपळ, तीच पळापळ, बंद पडून गेलंय "जीवन". तरी, सगळीकडे तेच ते , तेच ते आणि तेच ते.                    कवि- विश्वनाथ पै भाटीकर.

Techno women.

इमेज
माझी आई Techno women झाली आहे, रोज  नव - नवीन Technology ती वापरत आहे. Technology कुठलीही असू ,  कसं वापरायचं ते तील तोंडपाठ आहे. या Technology युगात, माझ्या बरोबर हातात - हाथ घालून ती चालत आहे. ती कितीही Technology बरोबर धावत असली तरी, माझं Hang पडलेलं जीवन, तीच तर सावरत आहे, तीच तर सावरत आहे.                       कवि- विश्वनाथ पै भाटीकर.