पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

GMC मधील ती.

इमेज
पांढरा कोर्ट  लाल - लाल ओठ सोनपरी माझ्या समोर आली I will check your pulse rate गालातल्या गालात हसत म्हणाली Hmm it's too fast ती उद्गारली तीला काय माहीत तीच्या स्पर्शाने  माझ्या हृदयाची रेल्वेच घसरली मी वेड्यापरी तीलाच न्याहाळत लागलो डॉक्टर पण इतकी Hot असू शकते  हे मला त्या दिवशी कळालं  Are you feeling ok ? तीने तंद्री तोडीत विचारले मी जरा बेशुद्धपणाची  नाटकं करू लागलो ती जराशी घाबरली  माझ्या शर्टाचे बटन उघडून  मला पुन्हा तपासू लागली  मनात माझ्या अनेक विचार येत होते काय तीची शरीर रचना करावा का थोडासा रोमान्स  असे अनेकदा वाटत होते मी तीला एकटक पाहतोय हे तीला कळालं  माझ्या कानफटीत लावून  तीने वासनेचं भुत उतरवलं GMC मधील ती  आता फक्त कवितेत राहीली त्या दिवसानंतर आजपर्यंत तीने माझ्याकडे पाठ फिरवली  GMC मधील ती  आता फक्त कवितेत राहीली (२)  कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी.

इमेज
मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी युनिव्हर्सिटीच्या वर्गात भेटलो चंद्र तारे सगळे फिके मी अप्सरेच्या प्रेमात पडलो  तशी आमची मैत्री जुनी  त्याला नवीन अंकुर फुटलं स्वप्नात घेऊन तीला कुशीत आमचं प्रेम तीथेच कुठंतरी फुललं भाषा आपल्या वेगळ्या तरी हृदयाचं गणित तीने बिघडवलं नक्षेदार डोळ्यांच्या तीच्या हाकेने कोंकणी - मराठीचं मिलन घडवलं  मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी M.A पुर्ण करता एकामेकांच्या प्रेमात पडलो भाषा, जात, धर्म या पलीकडे प्रेम असतं हे आम्ही सगळ्या जगाला शिकवलं मराठी बोलणारी ती व कोंकणी बोलणारा मी एकामेकांच्या प्रेमात पडलो (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

म्हणून केली नाही आत्महत्या.

इमेज
हिंमत होत नाही माझी स्वतःला लटकवून घ्यायची  पुलावरून नदीत उडी टाकायची हाताची नस कापण्याची म्हणून केली नाही आत्महत्या भिती वाटते मला माझी मी गेल्यावर होणाऱ्या परीस्थितीची  आई- वडीलांच्या वाढत्या वयाची बहीणीच्या होऊ घातलेल्या लग्नाची म्हणून केली नाही आत्महत्या लाज वाटते मला माझी एवढ्या लवकर हार मानली त्याची चार दिवस दु:खाचे काढू शकलो नाही त्याची कष्ट करण्यास आळसपणा केला त्याची म्हणून केली नाही आत्महत्या शेतकरी राजा घामाने अन्न पिकवतो दिवा वाऱ्यात पण तेवत राहतो  गरीब कष्टाने परीस्थितीशी लढतो तीच ताकत माझ्यात पण येईल म्हणून केली नाही आत्महत्या होईल सगळं सारखं जाईल दुःखाचे क्षण  येईल सोनेरी दिवस हीच आशा मनात फुंकून  केली नाही आत्महत्या (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मी मेल्यावर.

इमेज
आभाळदाटून पाऊस  अविरत पडू लागला मी मेल्यावर  ग्रह इतकी काय बदलली पुर आला पण जमीन कोरडीच राहीली मी मेल्यावर शरीर थंड पडेल हृदयाची टीक टीक बंद होईल कोणी अलाराम प्रमाणे हंबरडा फोडेन मी फक्त कान बंद करून झोपी जाईल मी मेल्यावर सुवासिक फुलांनी मला सजवले जाईल अत्तराचा सुगंध इतका होईल की  चितेची आग लगेच शमली जाईल मी मेल्यावर बाबा गेले आई गेली  मित्र सवंगडी सगळे गेले भुतांबरोबर मला एकटे सोडून साले गर्दीतले मुखवटेवाले गेले मी मेल्यावर  हाडांचे सांगाडे नदीवर गेले घेऊन अश्रूंच्या पोटली वाहून दिल्या त्या आठवणी  सुकलेल्या नदी तीरी मी मेल्यावर राहील्या फक्त आठवणी पुस्तकाच्या पानांप्रमाणे फाडल्या जातील मी असेन खूप दुर काही नक्षत्रामध्ये माझा शोध घेतील मी मेल्यावर स्मृती माझ्या पुसल्या जातील चार दिवस काय ते रडणे मग सगळे आपल्या कामात मिश्किल होतील मी मेल्यावर हो, मी मेल्यावर वरील सगळे काही घडून जाईल माझी ही अर्धवट कविता तेव्हा पुर्ण होईल मी मेल्यावर हो, मी मेल्यावर (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.