मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी.
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी,
एक समजून घेणारी सखी मिळावी.
स्वप्नात तशा असंख्य मुली भेटतात,
खऱ्या आयुष्यात एक तरी मिळावी.
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी,
माझे प्रेम समजून घेणारी बायकाे मिळावी.
राेज तशा असंख्य मुली भेटतात,
एक अफाट प्रेम करणारी प्रियसी मिळावी.
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी,
माझ्या साेबत हातात हात घालून चालणारी मैत्रिण मिळावी.
राेज तशा अनेक मी तुझी बहीण म्हणारी भेटतात,
तु माझा भाऊ नाहीस प्रियकर आहेस म्हणारी एकतरी मिळावी.
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी,
मी खचलाे की धिर देणारी बायकाे मिळावी.
ती गाेरी नसली तरी चालेल,
माझा साथ जीवनाच्या कुठल्याच क्षणाला न साेडणारी मिळावी.
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी,
एक समजून घेणारी सखी मिळावी.
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
Nice one
उत्तर द्याहटवाNice one
उत्तर द्याहटवाNice 👌
उत्तर द्याहटवाWow😍
उत्तर द्याहटवाAwesome poem
उत्तर द्याहटवा