गर्दी

ए तीचा लिंबू बघ

ए तीच्या पपाया बघ 

गर्दीत काही मित्र कुजबुजू लागले 


सभ्यपणाचा ढोंग करणारे 

काही मित्र गर्दीत तीच्या शरीराला

नको - नको तीथे स्पर्श करु लागले 


आवाज तिचा मोठा असुनही

गर्दीत ती मुकी झाली


मित्र - मैत्रिणी होत्या सोबत तरी

गर्दीत ती एकटी झाली


खिळतात पुरुषांच्या नजरा म्हणून

दोन- तीन कपड्यांनी अंग तीने झाकले होते


परत वार करण्याची होती तीच्यात ताकत पण

गर्दीत ती पांघळी झाली


माहीत नाही कुठून आली तीच्यात हिंमत

त्याच्या कानफटीत तीने मारले होते


गर्दीत ह्या पुरुषांच्या वासनेच्या

सिंहीण, माता, देवी ती झाली होती 


मी तीथेच उभा हे सगळे हतबल पाहत होतो

तीनं आपलं धाडसी रुप दाखवलं होतं व 

मी शेपूट गुंडाळलेलं मांजर झालो

 होतो (२)


कवि - विश्वनाथ पै भाटीकर




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

मनातले मला आज सांगायचे होते.

GMC मधील ती.