आज मी स्वप्न पाहिले होते.

दिसताच क्षणी ती मला भावली होती,
जणू काय आकाशातून अप्सराच,
धरतीवर मला भेटायला आली होती.

नुकतीच काय तर आमची दोस्ती झाली होती,
तिच्या बरोबर बोलायची इच्छा मनात आली होती,
पण साली बोबडीच तिच्या पुढ्यात बंद झाली होती.

आज मात्र सगळे चित्रच बदलले होते,
कधीही न बोलणाऱ्या गप्प- गप्प बसणाऱ्या
माझ्या त्या अप्सरेने हळूच,
मला हाका मारून बोलावले होते.

तिच्या त्या हाकेने माझे‌ हृदयच पिघळले होते,
तिच्या तोंडून माझेच नाव परत परत ऐकताना,
कान पण सुन्न झाले होते.

"ऑई विश्वनाथ!
ऑई विश्वनाथ!"
तिचे ते शब्द अजूनही,
माझ्या कानात घुमत होते,
घुमत - घुमत प्रेमाचे गीत वाजवत होते.

आजच्या मराठी तासाला तिला खूश करण्यासाठी,
मी माझ्या ‌काही कवितांचे‌ सादरीकरण केले‌ होते,
कविता सादर करतांना तिला माझी राणी करण्याचे,
आज मी स्वप्न पाहिले होते.
आज मी स्वप्न पाहिले होते.

            कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.