मी म्हणालो शब्दांना.

मी म्हणालो शब्दांना
तिला पण भेटून ये.

तिचे चित्र माझ्या मनात व
माझे तिच्या मनात हळूच कोरून घे.

माझ्या मनातले तिला व
तिच्या मनातले मला हळूच सांगून ये.

माझा स्पर्श तिच्या गालांवर व
तिचा स्पर्श माझ्या गालांवर हळूच करून ये.

तिला माझ्या मिठीची ऊब व
मला तिच्या मिठीची ऊब हळूच देऊन ये.

तिला प्रत्येक क्षणाला माझी आठवण व
मला प्रत्येक क्षणाला तिची आठवण हळूच करून दे.

दगदगीच्या ह्या जीवनात काही,
प्रेमाचे क्षण आम्हाला हळूच घालवू दे.

मी म्हणालो शब्दांना
तिला पण भेटून ये.

कवितेत तरी तिला माझी प्रेयसी व्हायला व
तिचा मी प्रियकर व्हायला हळूच एक कविता लिहून दे.(२)

 कवि - विश्वनाथ पै भाटीकर.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.