मोबाईल.

मांडलाय बाजार भावनांचा,
संवेदनाहीन मोबाईल नावाच्या मनामध्ये.

हरवले खरे हास्य मी,
खोट्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये.

मेंदू वजा डोकं झालंय माझं,
अडकलंय मोबाईलच्या सीपीयूमध्ये.

तुटली सगळी खरी नाती,
फसलोय मोबाईलच्या खोट्या नात्यांमध्ये.

मरून गेलं खरं प्रेम सारं,
अपडेट झालंय ते ‌मोबाईलच्या स्टिकरमध्ये.

भरकटलंय वेडं मन माझं,
बधीर झालंय मोबाईलच्या व्हायरसमध्ये.

पुसले गेले सगळे सुविचार,
अश्लील मोबाईलच्या कुविचारांमध्ये.

विसरून गेलोय सगळे फायदे त्याचे,
कलियुगातील मोबाईलच्या राक्षसांमध्ये.

फिकट झालंय पोषणयुक्त जेवण सुद्धा,
पोट भरू लागलंय मोबाईलच्या विषांमध्ये.

कुस्करून गेलंय जीवन सगळं,
हॅंग झालंय ते मोबाईलच्या खोट्या विश्वामध्ये.

मांडलाय बाजार भावनांचा,
संवेदनाहीन मोबाईलच्या मनामध्ये. (२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

  1. अप्रतिम...सुंदर शब्द मांडणी..☺

    उत्तर द्याहटवा
  2. Ya its true .........we r so much addicted to mobile ....nice poem keep blogging

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.