भेटायला ये.

माहीत आहे मला,
तू माझ्यावर रागावली आहेस,
तरी तो राग दाखवण्यासाठी,
म्हणून मला भेटायला ये.

तुझ्या नयानातून मला स्वप्न रंगवायची आहे,
तुझ्या नजरकैदेत मला कैदी व्हायचं आहे
म्हणून मला भेटायला ये.

अबोल असशील तू,
मला तुला एकटक पाहायचं आहे,
तुझ्या त्या भावनांना समजायचं आहे,
म्हणून मला भेटायला ये.

रसगुल्याचे ओठ तुझे,
नाही चव त्याला साखरेची,
मला अनुभवायची आहे ती चव,
म्हणून मला भेटायला ये.

तुझे ते लाजणे,
लाजरीलाही लाजवेल असे,
त्या लाजरीला मला स्पर्श करायचा आहे,
म्हणून मला भेटायला ये.

तुझ्या बरोबर ह्या पहिल्या,
मृदगंध पावसात भिजायचे आहे,
रुसलेल्या त्या पावसाला,
माझ्या मिठीतून फुलवायचे आहे,
म्हणून मला भेटायला ये.

हे माझे प्रेमपत्र नाही,
तर माझे हृदय समज,
माझे हृदय तुझ्याकडे ठेवून,
तुझे हृदय मला देण्यासाठी,
म्हणून तरी मला भेटायला ये.
भेटायला ये.

           कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.