मृत्यूवर काही चारोळ्या.
1)
डोळे मिटताच शांत झोप लागली,
मरणाला स्पर्श करताच,
तंद्री त्याची तुटली .. (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
2)
आत्ताच गाढ झोपेतून उठलोय,
थर - थर कापत घामाने चिंब भिजून ,
मरण म्हणजे काय ते समजून घेतलय,
पण परत झोपून त्याच सरणावर,
मरणाचा आनंद घेतोय... (२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
3)
निःशब्द डोळे माझे मलाच पाहत होते,
आत्मा होऊन स्मशानाच्या गर्दीत,
आज मी स्वतःलाच जाळले होते...(२)
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
4)
श्वास जरी थांबला तरी,
कार्य अजूनही जिवंत आहे.
शरीर जरी मेलं तरी ,
आत्मा अजून कवितेमध्ये
जिवंत आहे.
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
5)
स्मशानातली हाडं मोजताना,
आत्मा तिथेच घुटमळत आहे.
मृत्यू म्हणजे काय असते,
ह्याचाच शोध घेत आहे.
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
6)
स्मशानातली रात्र संपली तरी ,
काळोख मात्र तसाच आहे.
सूर्यालाही ग्रहण लागले कारण
आज मृत्यूची हार आहे.
7)
माझ्या सरणाची आग ही अजूनही शमली नाही,
काळोखात अजून दिवा त्याचा मालवला नाही.
मरण तर त्याला पाहूनच भयभीत होत आहे,
आत्मांना एकत्र करून माझ्या अंताची वाट तो पाहत आहे.
कवि- विश्वनाथ पै भाटीकर.
Awesome 👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा👍👍
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवाएकच कमेंट अवर्णनीय khupach chan charolya ahe Mitra God bless you
उत्तर द्याहटवा👌👌👌👌👌👌👌
Thank you 😊
हटवाTotally meaningful lines .....keep writing 👏✨
उत्तर द्याहटवाThank you 😊
हटवा