chance.

चल मी आता तुझ्याशी बोलणार नाही,
रुसून म्हणाली ती मला.

तू फक्त chance मारतोस,
माझा गालगुचा पुसत म्हणाली ती मला.

काय ही तुझी नाटके,
मला तुझं काहीही कळत नाही.

माझ्या ओठांच चुंबन घेतल्याशिवाय,
का रे तुला चैन पडत नाही.

त्यावर मीच तिला म्हटलं,
आता ठरलय ना लग्नं.

मग कसली आलीय चिंता,
मारू देना chance त्यात का होते शर्मिंदा.

त्यावर थोडा विचार करत ती मला म्हणाली,
आजच्या आपल्या भेटीबद्दल कोणालाही माहीत नाही रे विश्वा ,
काय सांगू त्यांना कुणाचे दात गालावर हे आता.

अगं सांग त्यांना हा माझाच,
फक्त माझाच उंदीर आहे.

फक्तं थोडा उतावळा होवून,
दुसऱ्या मुलींवर नाही तर,
स्वतःच्याच पत्नीवर chance तो मारत आहे. (२)

              कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.