हरवले.

मनाच्या गाभाऱ्यात शब्दं हरवलेत,
प्रेम हे माझे ओठांवर येण्या अगोदरच परतले.

तिच्या शोधात मी सगळे काही गमवले,
खऱ्या आयुष्यात नाही तर कवितेत तिला मिळवीले.

कवितेमधून तिला सगळ्या भावना सांगितल्या,
तरी तिला कधीच काही नाही कळले.

हे पण प्रेम माझे तसेच हवेमध्ये उडाले,
का कोण जाणे मला ऐकटे टाकून तसेच पळाले.

प्रेम मला झालेच नव्हते हे मला उमगले,
शब्दंप्रमाणे ते पण मनाच्या गाभाऱ्यात हरवले.. (२)

    कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.