गुलाबी आठवणी.

आठवणींच्या बागेत फिरून येताना,
वाटेत गुलाबाचं फुल दिसलं,
का कोण जाणे आपणच तोंडावर हसू उमलल.

त्या गुलाबा बरोबर तुझ्या आठवणी ताज्या झाल्या,
संपूर्ण बागेत आपल्याचकडे खेचत ,
परत - परत तुझाच विचार करायला भाग तो पाडू लागला.

त्या गुलाबाच्या प्रेतेक पाकळ्या मला,
तुझ्या बरोबरच्या आठवणी जाग्या करत होत्या,
आपल्या सुगंधा मधून पण तुझाच सुवास तो देत होता.

त्या कोमल पाकळ्यांचा स्पर्श मला,
तुझ्याच स्पर्शाची आठवण करून देत होता.

बागेत अनेक फुलं असली तरी,
मला फक्त तोच स्पर्श हवाहवासा वाटत होता.

आज ह्या गुलाबान माझं मन तृप्त केलं होत,
प्रेमाच्या वाटेत काटे असले तरी,

शेवट हा गोड असू शकतो,
हे त्यानेच आज मला शिकवलं होतं.

तुझ्या आठवणींना उजाळा देऊन ,
त्या आठवणींना गुलाबी आठवणी ,
ह्या गुलाबानेच केलं होतं.. (२)

                           कवि - विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.