मरण.

ज्यांनी मला जन्म दिला,
ते आक्रोश करीत रडत होते.

मित्र - सवंगडी थक्क होवून,
डोळ्यातून अश्रू गाळीत मलाच पाहत होते.

गर्दीत जमलेले काही मुखवटे,
मनातल्या मनात हसत होते.

मेला एकदाचा म्हणत त्यामधलेच,
काही माझेच गाणे गात होते.

माझी ईर्ष्या करणारे डोळ्यातून,
पहील्यांदाच माझी माफी मागत होते.

लाकडं घालतांना सगळ्यांचे,
हात थर - थर कापत होते.

एवढ्या लवकर डोळे का झाकले,
असे विचारत काही छातीवर मारत होते.

आज मी मरणाला - जळत्या सरणाला,
 खूप जवळून पाहिले होते.

स्वप्नात मला भेटून ,
पुढ्यात त्याच्या मी हरले होते.

निःशब्द डोळे माझे आज ,
मलाच पाहत होते.

आत्मा होऊन स्मशानाच्या गर्दीत,
मी आज स्वतःलाच जाळले होते...(२)

कवि - विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

  1. Very beautiful...this is actually a fact...keep it up vishwanath👌👌👍

    उत्तर द्याहटवा
  2. What a amazing poem bro
    Too good
    Asach Kavita lihit Raha
    Khupach changali Kavita aahe
    Keep it up

    उत्तर द्याहटवा
  3. Great discription about death through your poem....nice keep writing....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.