आठवणी.

आज पुन्हा ती मला भेटली,
गर्दीत पण दृष्टीस पडली.

आज पण तिचा चेहरा बोलका वाटत होता,
आपलं प्रेमभंग झालं असलं तरी,

मनात प्रेम अजून जीवंत आहे,
हे ओरडून - ओरडून सांगत होता.

तिने घातलेल्या पैंजणांचा आवाज मला तिच्या,
मोडत - मोडत चालण्याची आठवण करून देत होता.

ओठांवर माझ्या हसू आणून,
दातात दाबून ठेवत होता.

तिच्या कोमल हातांना पाहून,
तिची सारी वचने आठवली.
तिचा कोमल स्पर्श आठवला.

तिच्या केसांना पाहून ,
प्राजक्ताची फुले आठवली,
त्यांचा सुवास आठवला.

तिचं मंद हसू पाहून,
तिचं हास्य बघाण्याचा माझा मोह आठवला,
तिच्या गालावर पडणारी खिळी आठवली.

ह्या सगळ्या आठवणीने मन माझे ओथंबून गेले.
पण त्यांना पिळ देऊन ते फक्तं हसू लागले.

कारण गेले ते दिवस ,
राहिल्या फक्तं त्या आठवणी. (२)

कवि- विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.