एकटेपणाचे धडे.
चल विसर मला आता,
रडक्या स्वरात ती मला म्हणाली.
आपलं प्रेम एवढच होतं,
डोळ्यात आसवंसाठवित ती मला म्हणाली.
जमणार नाही आपलं,
मी तुला पहिलच म्हटलं होतं.
प्रेमात माझ्या पडू नको,
मी तुला कितीदा सांगितलं होतं.
मला माहीत आहे,
आता आवरणं कठीण झालंय,
तरी तुला आवरावं लागेल.
जे कटू सत्य आहे,
ते तुला स्वीकारावंच लागेल.
मला आता सवय झाली आहे,
तू पण सवय करून घे.
एकटेपणाने कसे जगायचे,
त्याचे धडे माझ्याकडूनच शिकून घे. (२)
कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
रडक्या स्वरात ती मला म्हणाली.
आपलं प्रेम एवढच होतं,
डोळ्यात आसवंसाठवित ती मला म्हणाली.
जमणार नाही आपलं,
मी तुला पहिलच म्हटलं होतं.
प्रेमात माझ्या पडू नको,
मी तुला कितीदा सांगितलं होतं.
मला माहीत आहे,
आता आवरणं कठीण झालंय,
तरी तुला आवरावं लागेल.
जे कटू सत्य आहे,
ते तुला स्वीकारावंच लागेल.
मला आता सवय झाली आहे,
तू पण सवय करून घे.
एकटेपणाने कसे जगायचे,
त्याचे धडे माझ्याकडूनच शिकून घे. (२)
कवि - विश्वनाथ पै भाटीकर.
Awesome Poem 👌👍
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा