म्हणून नाही Propose केलं मी तिला.

खूप आवडायची ती मला,
पण सांगण्याची हिम्मत कधी झाली नाही,
म्हणून नाही Propose केलं मी तिला.

वाटले तिची माझी मैत्री तुटेल,
ती WhatsApp वर Block करून,
Facebook वर Unfriend करेल,
म्हणून नाही Propose केलं मी तिला.

तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल,
ती चक्क शाकाहारी,
मी मत्स्यशिवाय कसा राहील,
म्हणून नाही Propose केलं मी तिला.

आपल्या जाती- पाती वरून दंगल उठतील,
आई- वडील माझ्याबद्दल काय विचार करतील,
म्हणून नाही Propose केलं मी तिला.

मग तिनेच मला आपला भाऊ केला,
राखी बांधून स्वप्नांचा सगळा चक्कचूर केला,
म्हणून हृदयावर टाचे मारून,
नाही Propose केलं मी तिला.

उगाचच  मग स्वतःची समजूत काढत राहिलो,
की "तीच Propose करेल मला",
 "तीच Propose करेल मला".

कारण "आवडतो मी तिला ",
 "आवडतो मी तिला ".
         
                           कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.