कविता.

चल हाथ सोड माझा,
रागाच्या भरात ती मला म्हणाली.

तू दुसऱ्यावर कविता लिहायला
लागलाय,
असं म्हणत माझ्यावर जाम भडकली.

काय सांगू ग सखे तुला,
मीच तिला म्हणालो.

कविता मी कोणावरही लिहिली असू,
प्रेम तर तुझ्यावर मी केलं.

माझी मिठी, माझे हृदय,
फक्त तुझीच वाट पाहातेय गं,

फक्त कानोसा देऊन ऐक,
माझ्या हृदयाचे ठोके पण तुझेच गीत गातेय गं.

लाजत ती मला म्हणाली,
मग माझ्या वर पण कविता लिही ना.

त्यावर मीच तिला म्हणालो,
काय लिहू गं सखे ,
काहीच कळत नाही .

आपलं आभाळा सारखं प्रेम ह्या कवितांमध्ये,
काहीही केल्या समावत नाही  (२)

                 कवि- विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.