माणसांना शोधत आहे.

गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे.

हृदयाच्या Hard-disk मध्ये मन गुंतवून,
माणुसकीच्या Virusला Antivirus शोधत आहे.

गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे.

डोक्याचा CPU Update वरती टाकून,
Hang झालेल्या माणुसकीला Boost करत आहे.

Battery जरी संपली तरी त्याची,
Charging cord साठी electricityची साथ शोधत आहे.

गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे.

माणुसकीला Google वरती टाकून,
Playstore वरून त्याचा App घेत आहे.

DP जरी बदलला त्याने,
त्याचा खरा चेहरा अंधारात पण शोधत आहे.

गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे.

Delete झालेली माणुसकी,
Recycling bin मधून बाहेर काढत आहे.

वेडापिसा होऊन, वड्यापिशांना शोधत आहे.

गर्दीत माणसांच्या माणसांना शोधत आहे. (२)

                                  कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.