चौकीदार.

उघड्या झाल्या वाटा,
उघडी झाली दारे,
निवडणुकीने दमदमले हे रणफुंकारे.

आत्ताच कुठे हा घोर पाऊस दाटून आला,
काळ्या नभातून सोनेरी किरणांनी हवेमध्ये उडाला.

मदारीच आत्ता नव- नृत्य करत आहे,
माकडाला लजवूनी पक्षांतरे तो करत आहे.

रावणाचा शत्रू आत्ताच मित्र झाला आहे,
सीता तिथेच सोडून फक्त उनाडक्या करत आहे.

टोप्या पण बदल्यात,
रंग पण बदलत आहे,
सिंहाला ठार करण्यासाठी कमळ सुद्धा डंक मारत आहे.

पैसाच हा आत्ता सगळा,
नवा खेळ खेळत आहे.

जनतेला वेठीस धरून,
रणफुंकारे तो फुंकत आहे.

पण फुंकाऱ्याचा वारा आत्ता ,
उलट दिशेने वाहत आहे,
सत्तेचा नाद त्याच्याच अंगलट येत आहे.

कारण चौकीदार चोर आणि
चोरच राहत आहे. (२)


                    कवि -विश्वनाथ पै भाटीकर.



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.