मी प्रेमवेडा.
भिती वाटते ग प्रेमात पडण्याची,
तुझ्या आणि फक्त तुझ्याच स्वप्नात गुंतण्याची.
पण सवय झालीय ग तुझ्यासाेबत बाेलण्याची,
त्या बाेलण्यात माझा तणाव विसरण्याची.
खुप काही सांगायच असत ग तुला,
पण सवय झालीय तुला पाहताच देहभान विसरण्याची.
मी प्रेमवेडा झालाेय ग तुझ्या प्रेमात,
मला घाई असते तुला मिठीत घेण्याची.
मी फक्त तुझा आणि तुझाच आहे ग,
इच्छा आहे तुझ्यासाेबत संसार ठाटण्याची.
मी तुला साेडून कधीही जाणार नाही ग,
शपत आहे मला तुझ्याच प्रेमाची.
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
Awesome 👍👌
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवा