परीक्षा.
परीक्षाच लिहीतो आहे,
आयुष्यात आयुष्याच्या.
रोज येतात पुढ्यात,
नव-नवीन प्रती प्रश्नपत्रिकांच्या.
लेखणी कधीही संपणार नाही,
इथे वेग-वेगळ्या विचारांच्या.
दुसऱ्यांची नकल करणे जमणार नाही,
वेग-वेगळ्या आहेत प्रती प्रत्येकाच्या.
हार आम्ही पत्करणार नाही पुढ्यात,
कठीण- कठीण परीक्षांच्या.
सामना करणार आम्ही प्रत्येक,
परीक्षेचा ह्या दगदगत्या जिवनांच्या.
परीक्षाच लिहीतो आहे,
आयुष्यात आयुष्याच्या.
कवि -विश्वनाथ पै भाटीकर.
👍
उत्तर द्याहटवाReally .it too good ..nice thought...
उत्तर द्याहटवाThanks 😊
हटवाThanks 😊
उत्तर द्याहटवा