वातावरण.


तापमान वाढले 50 डिग्री,
काय करायचे कळत नाही.

तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यासाठी,
जागा काही केल्या मिळत नाही.

तुझ्या चुकांसाठी देवाला दोष देऊन,
आता काही  केल्या चालणार नाही.

प्रदुषणाने केलीय घुसमट,
प्राणवायू काही केल्या विकत मिळणार नाही.

आभाळ दाटून पाऊस आता,
काही केल्या पडणार नाही.

करून झाडांची कत्तल,
वातावरणातला बदल काही केल्या थांबणार नाही.

                        कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.