Hang.


मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
संवेदना इथे Download करता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
माणूसकीला इथे virus मुक्त करता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
नात्यांची  Battery इथे Charge करता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
सकारात्मक विचार इथे Google करता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
आनंद इथे Shareit करता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
खऱ्या भावना इथे Whatsapp करता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
मनाशी Emergency संवाद इथे सादता येत नाही.

मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन,
जीवन ह्या शब्दाचा DP इथे बदलता येत नाही.

                           कवि -विश्वनाथ पै भाटीकर.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.