ती.


तीच्यावर काय लिहू ,
शब्द सगळे अपूरे पडतात.

तीच्या रूपाला पाहील्यावर,
आकाशातली नक्षत्रे सगळी कमी पडतात.

तीला हसताना पाहील्यावर,
वातावरणातील तणाव सगळे थंड पडतात.

तीच्या लाजण्याला पाहील्यावर,
ह्रदयाचे ठोके सगळे ठप्प पडतात.

तीचा आवाज ऐकल्यावर,
कान तिच्या प्रेमात पडतात.

तीच्या डोळ्यांना पाहील्यावर,
डोळे तीच्या मोहात पडतात.

तीला माझ्या समोर पाहील्यावर,
माझे मन परत तीच्या प्रेमात पडते.

                       कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

                                      




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.