कुठे आहेस रे तू ?


कुठे आहेस रे तू ?
आपल्या भक्तांना दर्शन देत नाहीस,
असा कुठला देव रे तू ?

आतापर्यंत डोळे बंद करून शोधत होतो मी रे तुला,
डोळे उघडल्यानंतरही का मला दिसत नाही रे तू ?

कुठे आहेस रामायणातला राम तू ?
कुठे आहेस महाभरतातला कृष्ण तू ?

होतात इथे अनेक अत्याचार तुझ्या भक्तांवर,
तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी का बर येत नाहीस रे तू?

अरे , पुरे झाला हा लपंडावाचा खेळ आता,
कधी तरी दर्शन देणार आहेस का रे तू ?

                                 कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.