गरम- गरम.

चाय गरम , नाश्ता गरम,
सगळ काही गरम- गरम.

निवडणूक जवळ आली की,
सगळे नेते होतात नरम-नरम.

जातात ते प्रत्येकाच्या घरात,
मोटर सायकलवर बसून करत बरम्-बरम्.

पसरवतात सगळीकडे मी निवडून आलो की,
तुमच काम करेन असा भ्रम-भ्रम.

निवडणूक संपल्यानंतर देव जाणे,
कुठे होतात हे सगळे अदृश्यम्.

मग लावतात गोव्याची,
वाट लरम्-लरम्.

म्हणून मी सांगतो योग्य नेत्याला,
मतदान करम्-करम्.

जो करेन गोव्याचा विकास,
गरम- गरम.
        
                  कवि -विश्वनाथ पै भाटीकर.




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मासिक पाळी. ( Periods)

GMC मधील ती.

मनातले मला आज सांगायचे होते.