पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कावळा.

इमेज
खूप पोटात दुखतयं गं आई  माझ्या बहिणीने आईला सांगितलं काय झालंय गं बहिणीला मी तीला विचारलं तीला आज कावळ्यानं शिवलं जवळ जाऊ नकोस ती उद्गारली आत्ता तर मी तीच्या जवळपास एकपण कावळा हींडू देत नाही मी असतानाही कसा शिवला कावळा  गुढ काही उलगडत नाही  कधीतरी मला पण शिवेल कावळा म्हणून मी आता अंगप्रदर्शन करत आहे फक्त पुरुषांनाच अंगप्रदर्शनाचा हक्क असतो का? साऱ्या जगाला प्रश्न विचारत आहे वासना पुरुषांच्या डोळ्यात असते की डोक्यात हेच मला समजत नाही लाज, शरम व अब्रू कुठे त्यांनी विकली उत्तर काही मिळत नाही (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.

मासिक पाळी. ( Periods)

इमेज
माझा आवडता लाल रंग त्या दिवसात मला आवडत नाही वेदना माझ्या त्या दिवसाच्या काही केल्या लपवत नाही बाईचा जन्म माझा म्हणून टोमणे मला सहन होत नाही शुध्द - अशुध्द अशी कशी मी झाले हे गणित मला उमजत नाही हात - पाय गळून पोट दुखणे हे अनेकदा सहन होत नाही मासिक पाळी प्रत्येक महिन्याला का येते या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नाही गणेश चतुर्थीला आला नंबर तर मन कुठेच काही रमत नाही देवाने दिलेले हे वरदान त्या दिवसात काही पटत नाही बाळंपणीला होते स्तुती पण  मासिक पाळीचे दु:ख समजत नाही अंकुर हे माझ्या पोटातील बीजानं फुलतं हे काही केल्या लोकांना कळत नाही पॅडच्या जागी कधी कपड्याला लागलं तर Awkward feeling लपवत नाही मासिक पाळी विषयीची अशिक्षिकता अजून काही केल्या जात नाही सांगितले दुःख मी माझ्या भावाला म्हणून काय ते कमी होत नाही पाच दिवस मासिक पाळीचे कधी - कधी मला आवडत नाही (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.