Love at first sight.

Gorgeous! काय दिसते रे यार ती, सहज तोंडातून उद्गार आले. जेव्हा मी तिला सृजनोत्सव मध्ये, लाल गुलाबी साडीत पाहिले. त्या लाल गुलाबी साडीमध्ये ती, लाल - लाल टमाटर दिसत होती. स्वप्नात मला आपल्याकडे खेचून, हळूच एक मुका देत होती. अरे विश्वनाथ काय झालं तुला? अचानक तिने मला प्रश्न केला. मी निरुत्तर तिला पाहतच राहिलो, हे स्वप्न तर नाही ना? मी मलाच विचारत राहिलो. 'आज तू खूप गोड दिसतेस. पाहता क्षणापासून तू मला आवडतेस. मला वाटतं माझा तुझ्यावर crush आहे', मी घाबरत - घाबरत तिला सांगितले. तिने पण लाजून, थॅंक यू, तू पण हीरो दिसतोस असे प्रतीउत्तर सांगितले. तिच्या हीरो या complimentने, माझ्या हृदयाचे ठोकेच गडबडले. Love at first sight सुद्धा असतं, हे मला त्या दिवशी उमजले. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.