पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आरक्षण.

इमेज
उभा होता मी आरक्षणाच्या दारात, भीक मला नको होती, स्वतः काय तरी करायचे होते. आरक्षणाच्या जाळ्यात शिरायचे, की परत्या पायाने घरी जायचे, असे दोनच पर्याय रहीले होते. खूप लोकांना पाहीले होते मी, आरक्षणामुळे लाचार हेताना, जाती-पातीमुळे गळफास घेताना. घेऊन हे सगळे विचार मनात, उभा होता मी आरक्षणाच्या दारात.    (2)                      कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

Hang.

इमेज
मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, संवेदना इथे Download करता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, माणूसकीला इथे virus मुक्त करता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, नात्यांची  Battery इथे Charge करता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, सकारात्मक विचार इथे Google करता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, आनंद इथे Shareit करता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, खऱ्या भावना इथे Whatsapp करता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, मनाशी Emergency संवाद इथे सादता येत नाही. मोबाईल Hang प्रमाणे झालय जीवन, जीवन ह्या शब्दाचा DP इथे बदलता येत नाही.                            कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

ती.

इमेज
तीच्यावर काय लिहू , शब्द सगळे अपूरे पडतात. तीच्या रूपाला पाहील्यावर, आकाशातली नक्षत्रे सगळी कमी पडतात. तीला हसताना पाहील्यावर, वातावरणातील तणाव सगळे थंड पडतात. तीच्या लाजण्याला पाहील्यावर, ह्रदयाचे ठोके सगळे ठप्प पडतात. तीचा आवाज ऐकल्यावर, कान तिच्या प्रेमात पडतात. तीच्या डोळ्यांना पाहील्यावर, डोळे तीच्या मोहात पडतात. तीला माझ्या समोर पाहील्यावर, माझे मन परत तीच्या प्रेमात पडते.                        कवि -विश्वनाथ पै भाटीकर.                                       

Blank Paper.

इमेज
Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, संवेदना इथे लिहता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, नाती इथे जोडता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, स्वप्न इथे रंगवता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, लोकांची मन इथे वाचता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, श्वास इथे घेता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, सुशिक्षिक्त असूनही स्वतःला सुशिक्षिक्त म्हणता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, प्रेम इथे करता येत नाही. Blank Paper प्रमाणे झालय आयुष्य, आयुष्य ह्या शब्दाचा अर्थही इथे कळत नाही.                                कवि -विश्वनाथ पै भाटीकर.        

गरम- गरम.

इमेज
चाय गरम , नाश्ता गरम, सगळ काही गरम- गरम. निवडणूक जवळ आली की, सगळे नेते होतात नरम-नरम. जातात ते प्रत्येकाच्या घरात, मोटर सायकलवर बसून करत बरम्-बरम्. पसरवतात सगळीकडे मी निवडून आलो की, तुमच काम करेन असा भ्रम-भ्रम. निवडणूक संपल्यानंतर देव जाणे, कुठे होतात हे सगळे अदृश्यम्. मग लावतात गोव्याची, वाट लरम्-लरम्. म्हणून मी सांगतो योग्य नेत्याला, मतदान करम्-करम्. जो करेन गोव्याचा विकास, गरम- गरम.                            कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

ती.

इमेज
ती वर्गात आली, मनाला खूप आनंद झाला. ती लाजली, माझ मन पण लाजू लागल. ती हसली, माझ मन पण हसू लागल. ती अचानक रडली, माझ मन पण रडू लागल. मला वाटल, मी पडलो तिच्या प्रेमात, डोळे उघडल्यानंतर कळल, मी होतो माझ्याच स्वप्नांच्या विश्वात.            कवि -विश्वनाथ पै भाटीकर.  

कुठे आहेस रे तू ?

कुठे आहेस रे तू ? आपल्या भक्तांना दर्शन देत नाहीस, असा कुठला देव रे तू ? आतापर्यंत डोळे बंद करून शोधत होतो मी रे तुला, डोळे उघडल्यानंतरही का मला दिसत नाही रे तू ? कुठे आहेस रामायणातला राम तू ? कुठे आहेस महाभरतातला कृष्ण तू ? होतात इथे अनेक अत्याचार तुझ्या भक्तांवर, तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी का बर येत नाहीस रे तू? अरे , पुरे झाला हा लपंडावाचा खेळ आता, कधी तरी दर्शन देणार आहेस का रे तू ?                                  कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

भेदभाव.

इमेज
का होतो हा भेदभाव ? कशासाठी होतो हा भेदभाव ? कुठून आला आहे हा भेदभाव ? कुठे जाणार आहे हा भेदभाव ? का होतो घरात हा भेदभाव ? का होतो घराबाहेर हा भेदभाव ? का होतो वर्गात हा भेदभाव ? का होतो कामावर हा भेदभाव ? कधी तरी संपणार का हा भेदभाव ? कधी तरी थांबणार का हा भेदभाव ? कुठे, कुठे लपण्याचा मी प्रयत्न केला तरी, का पाठ सोडत नाही हा भेदभाव ? (२)                              कवि -विश्वनाथ पै भाटीकर.