मनातले मला आज सांगायचे होते.
मनातले मला आज, तुला सांगायचे होते. करतो मी तुझ्यावर प्रेम, हे गुपित आज उलगडायचे होते. पण तुला पाहताच सारे, देहभान मी हरपले होते. धुंदीत तुझ्या मी रात्रंदिवस, तुझेच स्वप्न पाहिले होते. मनातले मला आज, तुला सांगायचे होते. तुझ्या काळ्याशार नयनांमधून, मला माझे सावळे प्रतिबिंब पाहायचे होते. घेऊन तुला मिठीत, प्रेमाचे अंकुर फुलवायचे होते. ओल्या चिंब पावसात मला, तुझ्यासवे भिजायचे होते. टेकवून ओठांना ओठ त्या पावसात, रसगुल्याचे ओठ मला चाखायचे होते. मनातले मला आज, तुला सांगायचे होते. असतील अनेक पऱ्या तरी मला, त्या एकच परीला पटवायचे होते. परत एकदा त्या परीला, गुलाबी साडीमध्ये कुशीत माझ्या घ्यायचे होते. नाही मला फक्त शारिरीक आकर्षण, तिचे सर्व आरोप मला पुसायचे होते. खरं प्रेम करतोय मी तिच्यावर, हे मला आज उलगडायचे होते. मनातले मला आज, तुला सांगायचे होते.(२) कवि- विश्वनाथ पै भाटीकर.