संमेलनातील ती.

रोज uniform मध्ये दिसणारी ती , आज वेगळीच दिसत होती, त्या गुलाबी साडीमध्ये, एक गुलाबी कळी भासत होती. फसवे तिचे ते नयन, मला आपल्याचकडे खेचत होते, मिठीत तिच्या सामावून , मला आपलाच ते करत होते. आज माझ्या चंद्राचं चांदणं , खऱ्या अर्थानं फुलून आलं होतं, संमेलनात का होईना तिचं तेज , माझ्यावरच पडत होतं. वाटत होतं शिक्षकांच्या नजरा चुकवून , जावून बसावं तिच्या जवळ, एक- दोन प्रेमाचे बोल , बोलावेत तिच्या बरोबर. संमेलनापेक्षा माझी ती, जास्त आकर्षक वाटत होती, संमेलन गेलं खड्यात, आपल्यावर कविता लिहायला, मला ती भाग पाडत होती. आज संमेलन खऱ्यानेच, खूप सुंदर झालं होतं, माझ्या गुलाबाने मला आपल्या, श्वासातून मोहीत केलं होतं. संमेलनात येण्याचा हाच तर, खरा फायदा झाला होता, तिला डोळे भरून न्याहळतांना, हृदय मात्र तिचेच चित्र, मनामध्ये कोरत होता. (२) कवि - विश्वनाथ पै भाटीकर.