पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेमाचा पाऊस.

इमेज
अस वाटत की, बघत राहव तीला, चिंब भिझताना पावसात. ओठांना ओठ टेकवून, करावा थाेडासा राेमांस, त्या थंडगार पावसात. त्याचक्षणी तिथेच, कराव तिला प्रपाेझ , त्या माेहीत पावसात. मिठीत उचलून घ्याव तीला, ह्या प्रेमाच्या उबदार पावसात.                           कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

खून.

इमेज
रोज सकाळी रक्ताने माखलेले, वर्तमानपत्र येते माझ्या घरात. दरराेज त्याच बातम्या , तेच समाचार, त्याच घटना, तेच कुविचार, माहीत नाही आज काेणी केलाय, काेणाचं शाेषण. पण झालाय खून भावनांचा, माझ्या आणि तुमच्याही.                  कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

प्रेम.

इमेज
आज पुन्हा वाटत, प्रेमात पडाव तिच्या. घ्यावा मऊ- मऊ गालांचा, गाेड-गाेड गालगुचा तिच्या. घालावा हार खऱ्या, नक्षत्रांचा गळ्यात तिच्या. शिराव माेहीत डाेळ्यातून, रंगदार स्वप्नात तिच्या. चिंब भिझाव पावसात, मोरासारख साेबत तिच्या. काेराव माझ नाव, कवितेव्दारे ह्रदयात तिच्या.          (2)                       कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

प्रेम.

इमेज
जमणार नाही आपल, आज मला कळल. ती माझी प्रियसी नव्हतीच, हे गुपीत आज उलगडल. बहीण-भावाच्या बंधनात, तिने आज मला अडकवल. तिच्या एकतर्फी प्रेमात, हाेत माझ मन भरकटल. प्रेम ह्या शब्दाचा अर्थ, तिच्या वागण्यातून आज मला उमगल.                          कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

परीक्षा.

इमेज
परीक्षाच लिहीतो आहे, आयुष्यात आयुष्याच्या. रोज येतात पुढ्यात, नव-नवीन प्रती प्रश्नपत्रिकांच्या. लेखणी कधीही संपणार नाही, इथे वेग-वेगळ्या विचारांच्या. दुसऱ्यांची नकल करणे जमणार नाही, वेग-वेगळ्या आहेत प्रती प्रत्येकाच्या. हार आम्ही पत्करणार नाही पुढ्यात, कठीण- कठीण परीक्षांच्या. सामना करणार आम्ही प्रत्येक, परीक्षेचा ह्या दगदगत्या जिवनांच्या. परीक्षाच लिहीतो आहे, आयुष्यात आयुष्याच्या.                                 कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

वातावरण.

इमेज
तापमान वाढले 50 डिग्री, काय करायचे कळत नाही. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यासाठी, जागा काही केल्या मिळत नाही. तुझ्या चुकांसाठी देवाला दोष देऊन, आता काही  केल्या चालणार नाही. प्रदुषणाने केलीय घुसमट, प्राणवायू काही केल्या विकत मिळणार नाही. आभाळ दाटून पाऊस आता, काही केल्या पडणार नाही. करून झाडांची कत्तल, वातावरणातला बदल काही केल्या थांबणार नाही.                         कवि -विश्वनाथ पै भाटीकर.