शमलेला पाऊस.

ढगांचेसुध्दा अश्रू दाटून आले, विजांचेही घोर युद्ध झाले, पिसाळलेला वारा जोर- जोराने वाहू लागला, आज स्मशानातली माझी प्रेतयात्रा पाहून, पाऊसपण उदास झाला. माझ्या तिरडीला सलामी देऊन, कळ्या नभातूनच नजरेआड झाला, माझ्या सरणाची आग शमताच, परत जोर- जोराने रडू लागला. (२) कवि- विश्वनाथ पै भाटीकर.