पोस्ट्स

मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी प्रेमवेडा.

इमेज
भिती वाटते ग प्रेमात पडण्याची, तुझ्या आणि फक्त तुझ्याच स्वप्नात गुंतण्याची. पण सवय झालीय ग तुझ्यासाेबत बाेलण्याची, त्या बाेलण्यात माझा तणाव विसरण्याची. खुप काही सांगायच असत ग तुला, पण सवय झालीय तुला पाहताच देहभान विसरण्याची. मी प्रेमवेडा झालाेय ग तुझ्या प्रेमात, मला घाई असते तुला मिठीत घेण्याची. मी फक्त तुझा आणि तुझाच आहे ग, इच्छा आहे तुझ्यासाेबत संसार ठाटण्याची. मी तुला साेडून कधीही जाणार नाही ग, शपत आहे मला तुझ्याच प्रेमाची.                              कवि -विश्वनाथ पै भाटीकर.

मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी.

इमेज
मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, एक समजून घेणारी सखी मिळावी. स्वप्नात तशा असंख्य मुली भेटतात, खऱ्या आयुष्यात एक तरी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, माझे प्रेम समजून घेणारी बायकाे मिळावी. राेज तशा असंख्य मुली भेटतात, एक अफाट प्रेम करणारी प्रियसी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, माझ्या साेबत हातात हात घालून चालणारी मैत्रिण मिळावी. राेज तशा अनेक मी तुझी बहीण म्हणारी भेटतात, तु माझा भाऊ नाहीस प्रियकर आहेस म्हणारी एकतरी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, मी खचलाे की धिर देणारी बायकाे मिळावी. ती गाेरी नसली तरी चालेल, माझा साथ जीवनाच्या कुठल्याच क्षणाला न साेडणारी मिळावी. मी कुठे म्हणताे 'परी' मिळावी, एक समजून घेणारी सखी मिळावी.                          कवि -विश्वनाथ पै भाटीकर.